महाराष्ट्र वेदभुमी

रोहयाच्या श्री खंडेराय देवस्थानचा चंपाषष्ठी महोत्सव व पालखी सोहळा साजरा


रोहा दि. १९ डिसें. प्रतिनिधी ;-

 रोहा येथिल श्री खंडेराय देवस्थान मंदिरात बुधवार दि. १३ डिसें. पासून गेली सहा दिवस चंपाषष्ठी महोत्सव भक्तिभावाने सुरू आहे. चंपाषष्ठी निमित्ताने श्री खंडेरायांचा पालखी उत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोहा शहरात श्री खंडेरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी गर्दी करून पालखीचे दर्शन घेतले...

संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत व अनेक कुटुंबांचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायांचे रोहा येथील धनगर आळी येथे सुंदर मंदीर आहे. या मंदिरात नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. मंदिरातील चंपाषष्ठीचा उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होत असून हा उत्सव सहा दिवस चालतो. यावेळी मंदिरात भजन, किर्तन, व्याख्यान, पूजार्चन, लघुरुद्राभिषेक, तळीभंडार, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले.  सोमवारी पालखी मिरवणूक झाल्यानंतर आज मंगळवारी मंदिरात भंडारा महाप्रसादाच्या कार्यक्रमाने चंपाषष्ठी सोहळ्याची सांगता झाली, यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. महाप्रसादानंतर महिला मंडळ आणि मुलांकरीता बक्षीस वितरण कार्यक्रम ही संपन्न झाले. यावेळी मंदिरात श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष तथा बाळशेठ खटावकर, हिंदू धनगर समाज पंचमंडळाचे अध्यक्ष मल्हार भांड, पुजारी संभाजी लाळगे तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष अमेय भादेकर आदी उपस्थित होते. चंपाषष्ठी महोत्सवात श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष तथा बाळशेठ खटावकर, उपाध्यक्ष हेमंत शेवाळे, सरचिटणीस संजय कवितके, सचिन कुरकुंडे, राहुल गुंड, मिलिंद रायकर, मार्तंड भांड, रविंद्र शेवाळे, सुनिल भादेकर, राजेश विरकर, समीर गोरे, संभाजी लाळगे, संतोष भादेकर, अमेय भादेकर, पंचमंडळाचे पदाधिकारी मल्हार भांड, दिलीप शेवाळे, किशोर मधुकर पाडसे, चंद्रशेखर गुंड, संजिव कवितके, शिरीष गुंड, सदानंद भांड आदींसह उत्सव समितीचे सदस्य आणि महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले..

Post a Comment

Previous Post Next Post