महाराष्ट्र वेदभुमी

उरण मधील पहिल्या मानाची पालखीचे उरण ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन.

 


उरण दि १२(विठ्ठल ममताबादे)

श्रद्धा व सबुरी या तत्वावर विश्वास ठेवून शिर्डिचे प्रसिद्ध संत साईबाबा यांना माननारा,त्यांची भक्ति करणारा खूप मोठा वर्ग उरण तालुक्यात असून याच साई भक्तांच्या वतीने साईबाबांचे नामस्मरण, भजन करत दरवर्षी उरण ते शिर्डी असे पायी पदयात्रेचे आयोजन केले जाते. उरण तालुक्यातील श्री साई बाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ(रजि.)उरण तालुका व देणगीदार, जनतेच्या वतीने काढण्यात आली असून गेली २२ वर्षे ही पदयात्रा निरंतर, श्रद्धामय, धार्मिक वातावरणाने शिस्तमय पद्धतीने आजही चालूच आहे. यंदा पदयात्रेचे हे २३ वे वर्ष आहे. यंदा श्री साई सेवा मंडळ उरण तालुका, देणगीदार, जनता यांच्या वतीने भव्य पालखी, वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर, देऊळवाडी(उरण शहर)येथून रविवार दि १७/१२/२०२३ रोजी सकाळी ७  वाजता श्री ची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान होणार आहे.तब्बल २६१ किलामीटरचा पायी प्रवास(पदयात्रा) करून पालखी दत्त जयंतीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच सोमवार दि २५/१२/२०२३ रोजी सकाळी १० वा. श्री क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचनार आहे. पालखी दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ श्री साई भंडारा व श्री सत्य नारायणाची महापूजा शनिवार दि ०६ जानेवारी २०२४ रोजी श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार, उरण येथे संपन्न होणार आहे. रविवार दि १७/१२/२०२३ रोजी सकाळी ७ वा श्री ची पालखी व पादुका साई भक्तांच्या दर्शनासाठी श्री दत्त मंदिर देऊळवाडी येथे ठेवण्यात येणार असून साई भक्तांनी या श्री च्या पालखी व पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा मंडळ उरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी

संदीप पाटील -99205 48181,(९९२०५४८१८१)

अजित पाटिल-9322888505,(९३२२८८८५०५)

राजेंद्र पाटील - 8879614919,(८८७९६१४९१९)

सुनील पाटिल-9664165877,(९६६४१६५८७७)

हरेश्वर ठाकुर-9819979128 (९८१९९७९१२८)

यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post