महाराष्ट्र वेदभुमी

रोह्यातील युनिकेम कंपनीवर ४ जाने. ला गेट बंद आंदोलन, स्थानिक भुमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भाजपा आक्रमक!



रोहा दि. २८ डिसें. विशेष प्रतिनिधी :

आम. प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील करणार आंदोलनाचे नेतृत्व - तालुकाध्यक्ष अमित घाग यांची पञकार परिषदेत माहिती

कारखाना प्रदूषण आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा तसेच स्थानिकांना कामे देण्यापासून टाळाटाळ करणा-या युनिकेम लॅबोरेटरीज कंपनीविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या ०४ जाने. पासून गेट बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली... 

अमित घाग यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना पुढे सांगितले की, धाटाव औद्योगिक वसाहतीत बहुचर्चित युनिकेम लॅबोरेटरीज या केमिकल कंपनीमध्ये स्थानिकांना कामे मिळावीत यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आलो आहोत...त्याचबरोबरीने प्रदूषण नियंत्रण आणि कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेबाबतसुद्धा वारंवार चर्चा केली आहे... हि केमिकल कंपनी असल्यामुळे प्रदूषण आणि वारंवार कंपनीत घडणाऱ्या अपघातामुळे सदर कंपनी नेहमी चर्चेत राहिली आहे, त्यामुळे या कंपनीचे व्यवस्थापन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी सर्वसामान्यांवरती अन्याय करत आहे...  या कंपनीत २०० हुन अधिक कंत्राटी कामगार आहेत...कंपनी कामगारांच्या सुरक्षतेबाबतीत योग्य काळजी घेत नसल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे या कामगारांच्या संदर्भात वारंवार कंपनी व्यवस्थापनाशी आम्ही चर्चा करत आहोत... अनेक प्रश्न आहेत आणि ते सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याचबरोबरीने स्थानिकांना कंपनीतील कामे प्राधान्याने मिळाली पाहिजे, हि सुद्धा आमची आग्रही मागणी आहे... मात्र  या बाबतीत व्यवस्थापन मनमानी करत असल्याचे आणि दबावतंत्राखाली काम करत असल्याचे अलीकडे स्पष्ट झाले आहे...यामुळे स्थानिकांमध्ये कंपनी व्यवस्थापन विरोधात असंतोष खदखदत आहे... म्हणूनच स्थानिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा उभारत आहोत. दि. ०४ जाने. पासून आयोजित केलेल्या गेट बंद आंदोलनाच्या दिवसापासून या लढ्याला धार वाढत जाणार आहे आणि जो पर्यंत कामगार व स्थानिकांना न्याय मिळत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही अमित घाग यांनी यावेळी कंपनीला दिला असून होणाऱ्या परिणामांना कंपनी व्यवस्थापनच सर्वस्वी जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे...

या आंदोलनाचे कारण स्पष्ट करताना भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी सांगितले की खासदार सुनील तटकरे हे नेहमीच स्वतःच्या स्वार्थापोटी स्थानिकांच्या पोटावर मारत असतात. स्थानिकांना देण्यात येणाऱ्या कामात ते नेहमी खो. घालत असतात. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करण्याचा विषय असो अथवा कामगारांना १२- १२ तास काम करावे लागणे असू द्या या बाबतीत तटकरे कधीही बोलत नाहीत. आणि स्थानिक तरुणांना मिळणाऱ्या छोट्या-मोठ्या कंत्राटांमध्ये देखील तटकरेंच्या दबावाखाली कंपनी व्यवस्थापन बळी पडत असल्याने स्थानिकांना कामापासून अडवले जात आहे.  धाटाव औद्योगिक वसाहतीत कारखानदारांचा मीच पालनहार, आश्रय दाता असे भासवत ब्लँक मेलिंग करण्याच्या त्यांच्या या प्रकारामुळे एमआयडीसीतील अर्ध्या कंपन्या बंद पडल्या आहेत, येथे सुरू असलेल्या मूळ ४० ते ५० कंपन्यांपैकी आता फक्त ३० कंपन्या सुरु आहेत. उरलेल्या कंपन्यांना नामशेष करण्याच्या मार्गावर ते आहेत. रोहा तालुक्यात वापरायचा सीआरएस फ़ंड कंपन्यांना भीती दाखवून तालुका व जिल्हा बाहेर नेण्याचे प्रकार करून तालुक्याला अपेक्षित विकासापासून वंचित ठेवण्याचाही खा. सुनिल तटकरे करीत असलेल्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करीत असल्याचे अमित घाग यांनी सांगितले आहे...

यावेळी भाजपाचे आनंद लाड, एकनाथ ठाकूर, कृष्णा बामणे, रविंद्र तारू, विष्णू मोरे, अरुण वाघमारे, महेश ठाकूर, नरेश कोकरे, शेखर गोळे, रघुनाथ कोस्तेकर, धनराज उमाळे, सचिन मोदी, रोशन चाफेकर, रहुप कवडेकर,  इम्रान पानसरे, कल्पेश माने, वैभव कुलकर्णी आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post