महाराष्ट्र वेदभुमी

नडवली संघ ठरला अंतिम विजेता.


कोलाड (श्याम लोखंडे ) :

गावदेवी नडवली क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 रोहा तालुक्यातील गावदेवी क्रीडा मंडळ नडवली आयोजित क्रिकेट सामन्यात अखेर अतितटीच्या लढतीत गावदेवी नडवली संघ ठरला स्पर्धेत अंतिम विजेता स्पर्धेतील अंतिम सामना हा नडवली विरुद्ध धाक्सूद चिल्हे यांच्यात झालेल्या अखेरच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर गावदेवी नडवली संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर धाक्सुद चिल्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक यंगस्टार देवकान्हे हा संघ मानकरी ठरला... उत्कृष्ट सामनावीर नडवली संघाचा नितीन भोसले, स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज देवकान्हे संघाचा स्वप्नील भोईर ,तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून गावदेवी नडवली संघाचा संदेश मोहिते यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले...


खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने श्री गावदेवी क्रीडा मंडळ नडवली यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा नडवलीच्या प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन खांब विभागीय कुणबी समाजाचे अध्यक्ष तथा खांब ग्राम पंचायतीचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते रामचंद्र चितलकर, युवा नेते मनोज शिर्के, खांब ग्राम पंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ कांचनताई मोहिते, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे खांब विभागीय अध्यक्ष पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे,नडवली गावचे अध्यक्ष व आदर्श शिक्षक किशोर जाधव, सेवा निवृत्त शिक्षक रमाकांत जाधव, अभिजित भोसले, मारूती मांडलुस्कर,यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते करण्यात आले...


खांब क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने श्री गावदेवी क्रीडा मंडळ नडवली यांनी भव्यदिव्य आयोजित केलेल्या सदरच्या मर्यादित शतकाच्या क्रिकेट स्पर्धेला रसिकप्रेशकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता.तर खेळातील अंतिम फेरीचा सामना नडवली विरुद्ध चिल्हे यांच्यात रंगतदार झाला तर प्रथम नाणेफेक जिंकून धाक्सूद चिल्हे नी क्षेत्ररक्षण स्वीकारले तर नडवली संघानी धुव्वांधार खेळी करत तीन शतकात एक बाद ४५ धावा करत ४६ धावांचे आव्हान धाक्सुद चिल्हे समोर ठेवले मात्र त्याचा पाठलाग धाक्सुद चिल्हे संघाच्या फलंदाजांना करता आले नाही तर नडवली संघाच्या गोलंदाजांनी अवघ्या २९ धावांवर रोखत अंतिम विजयाची नोंद केली...

अभुतपुर्व प्रतिसाद लाभलेल्या सदरची स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी गावदेवी नडवली क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकारी वर्गाने व खांब क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अजय भोसले सह सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post