माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
एस एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर मध्ये २९ वा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मंगळवार दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी उत्साहात साजरा झाला...या कार्यक्रमाचे अध्यक्ष माणगांव एज्युकेशन ट्रस्टचे शालेय समिती अध्यक्ष मा ऍड प्रकाश ओक तसेच प्रमुख पाहुणे पुणे येथील बांधकाम सल्लागार मा.श्री.प्रसाद गणपुले व शिक्षणतज्ञ मा. सौ.शिल्पागौरी गणपुले म्हणून लाभले... सौ शिल्पागौरी गणपुले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले...प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला व विविध क्षेत्रात नैपुण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली व त्यांचे कौतुक करण्यात आले...
नर्सरी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले...बालचमुंनी कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले...सर्व शिक्षक वृंद यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे खूप सुंदर सांस्कृतीक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले,या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, माणगाव,लोणेरे,तळा शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. आनंदाच्या वातावरणात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला...
