कित्येक संकटे लीलया पार करण्याचे बळ परमेश्वर बहाल करत असतो, फक्त कार्य सिद्धीचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असावा.
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
"उभारिला हात ! जगी जाणवली मात !!"देव बैसले सिंहासनी ! आल्या याचका होय धनी !!
धार्मिक कार्याला, पुण्याच्या कार्याला, विधायक कार्याला परमेश्वराचे अधिष्ठान असतेच असते.. कित्येक संकटे लीलया पार करण्याचे बळ परमेश्वर बहाल करत असतो.. फक्त कार्य सिद्धीचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असावा.. असाच काहीसा प्रत्यय म्हणून धामणसई गावातील हनुमान आणि विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धार कार्यात अनेक ग्रामस्थांना आला आहे.
रोहा तालुक्यातील धामणसई गावातील दोन वर्षांपूर्वी मंदिर पुनर्रबांधणीचा येथील ग्रामस्थांनी सोडलेला संकल्प आज खऱ्या अर्थाने पुर्णत्वास जाताना दिसून आला यावेळी होणारा यावेळी ग्रामस्थांचा आनंद अवर्णनीय आहे. येथील पिढीचे भाग्य थोर हा सोहळा याची देही याची डोळा मंदिरात मूर्ती सिंहासनी बसविल्या नंतर अनुभवायला मिळाला...जन्माचे सार्थक झाल्याचा भाव प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरुन ओसांडून वाहत होता.कारण हे भगवंताचे कार्य पुन्हा पहायला मिळेल याची काहीच श्वासती नाही.प्रत्येक जन भक्तीभावाने प्रत्येक धार्मिक विधीत तल्लीन होऊन सामील झाला होता...
कदाचित पूर्व पुण्याईचे संचित असावे म्हणूनच या कार्याक्रमाचे साक्षीदार होता आले...गावावर मारुती रायाची कृपादृष्टी कायमच राहीली आहे.त्यामुळे कैक विघ्ने गावावर येऊनही गावच्या अखंडतेत कोणत्याही प्रकारचा दुभंग आला नाही.तर शक्ती आणि भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाबली-महारुद्र हनुमंत राया, यांच्या कृपा आशीर्वादाने आर्थीक बाजू कमकुवत असतानाही प्रखर इच्छा शक्तीच्या आणि भगवंता वरील अफाट श्रद्धेच्या जोरावर आज देवाचे देवालय ऊभे राहिले आहे आणि देव सिंहासनावर विराजमान झाले आहेत.. हे बघण्याचे आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे भाग्य फार कमी जनांच्या नशिबी येते..
या मंदिर उभारणीत कित्येकांचे अमूल्य योगदान लाभले. कित्येक हात दोन वर्ष राबत होते, कित्येक डोळे पुर्णत्वाच्या संकल्पनेने असूरलेले होते..आज दोन वर्षांनी देवालय पुर्णत्वाकडे जाताना सगळे भरुण पावले.. प्रतीक्षेत असलेले डोळे कृतार्थ झाले..
बाळ-आबाळां पासून तरुण- वृद्धांसोबत, माता-भगीनींपासून प्रत्येक जन भक्तीरसात न्हावून निघाला होता.. राग, लोभ, रूसवा, विसरून बंधूभावाने प्रत्येक ग्रामस्थ भगवंताच्या- मारूतीरायाच्या चरणावर नतमस्तक झाला होता..गावातील जुण्या जाणत्या, आयुष्याच्या उंबरठ्यावर असणार्या कित्येकांच्या चेहर्यावर समाधानाची लकेर जाणवत होती..
प्रार्थना, ध्यानधारणा, त्याग आणि उपासनेच्या पविञ हेतूने उभारलेले हनुमंतरायाचे देवालय हे धामणसई करांच्या एकात्मतेचे प्रतिक तर नक्कीच ठरेल...देव जरी देवालयात निवासाला असले तरी देवाचे चिरंतर सिंहासन आम्हा धामणसई करांच्या ह्रदयात कायम स्थापीत असेल.. आध्यात्मिक शक्ती या देवालयाच्या स्वरूपात आमच्या अंतरंगात कायम वावरत राहील.. दुष्ट प्रवृत्ती, क्लिष्ट यांचा मागमूसही नसेल कारण आमचा पाठीराखा साक्षात मारूतीराया असेल...
येणाऱ्या काळात गावातील तरुणवर्ग युवापिढी गावासाठी मारूतीरायाप्रमाणे अव्हानांचा, संकटांचा महामेरू आपल्या बळभक्कम बाहुंवर तोलून धरेल..त्याच्या बाहुंमध्ये बळ भरण्यास हनुमंतराया समर्थ आहे...माता भगीनी निर्धास्त असतील अन्याय अत्याचारा विरूद्ध लढण्यास मारूतीराया सदैव शक्ती प्रदान करेल...बाळ - गोपाळ कायम हर्षभरित राहतील कारण मारुतीरायाची कृपादृष्टी कायम असेल...आबाळ -वृद्ध समाधानी असतील कारण भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेला मारूतीरायाच्या कृपाछञाखाली गावचे भविष्य उज्वळ आहे हा विश्वास कायम आहे...
🍂🍁🌾🌿🙏🙏लेखन संकलन🙏🙏🌿🌾🍁🍂
✍️ विश्वास सानप✍️
🏵️ धामणसई,रोहा-रायगड.🏵️
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
