महाराष्ट्र वेदभुमी

कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगार नेते सुरेश पाटील,सुधीर घरत यांची सकारात्मक चर्चा.



उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे)

कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत चर्चा

भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ ही कामगारांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस कार्यरत असून ही संघटना भारतातील सर्वात मोठी संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाशी संलग्न माहे. संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्या अनुषंगाने प्रलंबित प्रश्न, समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी भारतीय पोर्ट आणि डॉक महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची नुकतीच दिल्लीत भेट घेतली. व त्यांच्या सोबत कामगारांच्या समस्यावर चर्चा केली. यावर कामगारांच्या समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री श्रीपाद नाईक यांनी कामगार नेते सुरेश पाटील, कामगार नेते सुधीर घरत यांना दिले.

Post a Comment

Previous Post Next Post