महाराष्ट्र वेदभुमी

रोहा पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल...



शहानवाज मुकादम/रोहा

बनावट अखत्यारपत्र व तोतया इसम उभे करुन फसवणूक!

रोहा:तालुक्यातील मौजे गोफण व शेडसई येथे बनावट आखत्यारपत्र तयार करुन तोतया इसम उभे करुन फिर्यादी यांची संगनमताने फसवणूक केल्या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

 फिर्यादी प्रविणा लक्ष्मण दगडे,वय ४९ वर्ष,रा.सिव्हिल हॉस्पिटल समोर दादर आळी,टेंबीनाका ठाणे, यांनी दि:०५/१२/२०२३,रोजी रोहा पोलीसांना दिलेल्या फिर्यादीवरून सन:२०११ ते दि:१३/०८/२०१२ रोजी च्या दरम्यान आरोपी यांनी संगनमताने मौजे गोफण व शेडसई ता. रोहा येथील गट नं. ३१५ क्षेत्र २-३४-१ आकार ४-९ या मिळकतीचे खोटे व बनावट आखत्यारपत्र तयार केले होते,

 सदरच्या खोट्या आखत्यारपत्राच्या आधारे दस्त क्रमांक २६१८/२०१२ अन्वये खरेदी खत करुन फिर्यादी यांच्या वडीलांच्या संमती शिवाय परस्पर उमाकांत तुकाराम गावंड रा.नारंगी टेप हशिवरे ता. अलिबाग यांना खोटे व बनावट अखत्यारपत्र देवून आणि तोतया इसम उभे करुन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे...सदरची जमीन खरेदी करतांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता खरेदीची घाई करून व्यवहार करुन फसवणूक केली अशी देखील चर्चा होतांना दिसत आहे...

सदर प्रकरणी आरोपी १) लक्ष्मी लक्ष्मण कदम रा.खारी पो.खारगांव ता.रोहा २) नथुराम तुकाराम कडु रा. गोफण ता.रोहा ३) सुधीर महादु कडु रा.गोफण ता.रोहा ४) भालचंद्र महादु कडु रा.गोफण ता.रोहा ५) यशोदा महादु कडु उर्फ राजेश्री राजेंद्र गंभे रा. खैराळे ता.रोहा ६) संगिता महादु कडु उर्फ संगिता सुरेश निकम रा.गोफण ता.रोहा ७)ईश्वर नथुराम कडु रा.गोफण ता.रोहा ८) समीक्षा सदानंद पडवळ उर्फ पिंकी रा. खांबेरे चणेरा ता. रोहा ९) उमाकांत तुकाराम गावंड रा. नारंगी टेप ता.अलिबाग सर्व जि.रायगड,यांच्याविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात कॉं.गु.र.नं-१८१/२०२३, भा.द.वि.का.क. ४२०, ४१९, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे...

 सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनात पोहवा/७७३ महेंद्र दामा शिद करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post