रोहा प्रतिनिधी रघुनाथ कडू
गोफण गावातील सामाजिक,कला,क्रिडा, आणि आध्यात्मिकाचे जनक हभप कै.भास्करबाबा शिंगरे यांचे त्या धर्मपत्नी तर निरंकारी सांप्रदायिक प्रसारक महात्म्य आदरणीय सुभाषजी शिंगरे यांच्या मातोश्रींचे शनिवार दिनांक २३/१२/२०२३रोजी ठिक ५ वाजता भाद्रपद एकादशीच्या दिवशी वयाच्या ८५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला...
पती भास्कर बाबा शिंगरे यांच्या पच्छात आजवर १७ वर्ष एकनिष्ठ वारकरी संप्रदायात सहभागी राहून सांस्कृतिक अध्यात्मिक वसा निरंतर जपला...कुटूंबाशी समविचाराने व सात्विकतेची वर्तणूक असलेल्या सरस्वती ह्या कुटूंबासह सर्वांची आई शोभावी अशी होती...मनमिळावू शांत हलव्या स्वभावाने त्या सर्वांना हवाहवास्या वाटत होत्या...तर कधीच कोणाविषयी द्वेश मत्सर न बाळता कोणी चुकल्यास समजाऊन मायेचा हात फिरवत असत...
अशा पुण्यवान मातोश्रींचे वृद्धापकाळाने इहलोकांतून स्वर्ग गमन झाल्याने शिंगरे कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर पडल्यासारखे झाले...ही पोकळी निर्माण झालेली कधी न भरुन येणारी आहे... त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अंत्ययात्रेला जनसामुदाय एकवटला होता...
पुढील अंतिम विधी सोमवार दिनांक ०१/०१/२०२४ रोजी दसपींड गोफण येथील कुंडलिका तीरावर सकाळी १०च्या दरम्यान होणार तर तेरावे गुरुवार दिनांक ०४/०१/२०२४ रोजी रहात्या घरीच होणार असल्याचे सांगितले आहे...
त्यांच्या पच्छात शोकाकुल महादेव, सुभाष,विनायक,विलास अशी चार मुले तर पिठूबाई उर्फ श्रीमती सुषमा जाधव या एक कन्या असून सुना नातवंडे,नाती जावई तसेच शिंगरे,जाधव परिवार असा मोठा परिवार आहे...