महाराष्ट्र वेदभुमी

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट.

 


उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )

वशेणी नवनिर्वाचित उपसरपंच कु. ज्योत्स्ना पाटील व नवनिर्वाचित शाखाप्रमुख बी के पाटील यांनी घेतली

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वशेणी शाखेच्या शाखाप्रमुख पदी  बाबुराव कमळ पाटील (BK) यांची तर वशेणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कु. ज्योत्स्ना राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल शाखा प्रमुख बाबुराव पाटील व उपसरपंच कु. ज्योत्स्ना पाटील यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी  माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच कु ज्योत्स्ना पाटील व नवनिर्वाचित शाखाप्रमुख  बी के पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

 सदर वेळी उरण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उरण संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, वशेणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अनामिका म्हात्रे, शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस व पेण प्राथ. शिक्षक पतपेढीचे संचालक हितेंद्र म्हात्रे, द्रोनागिरी शहर संघटक किसन म्हात्रे, माजी शाखाप्रमुख व विद्यमान ग्रा.पं. सदस्य गणेश म्हात्रे, माजी ग्रा.पं. सदस्य  राजेंद्र पाटील, शिवसेना कार्यकर्ते दिपक पाटील, अभिमन्यू तांडेल, संदिप पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post