महाराष्ट्र वेदभुमी

जासई विद्यालयात शशिकला पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत.



उरण दि २९(विठ्ठल ममताबादे)

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप  इन एज्युकेशन २०२३-२४यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,या प्रतिष्ठानकडून मिळालेली फेलोशिप शशिकला पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरली आहे.श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता.उरण जि.रायगड.या विद्यालयाच्या उपशिक्षिका शशिकला चंद्रकांत पाटील यांना इयता  ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थांना स्वयं: अध्ययन करण्याची सवय वाढविण्याच्या उपक्रमांतर्गत मिळालेल्या फेलोशिप मधून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अध्यापनात चांगले मार्गदर्शन मिळण्यासाठी जासई हायस्कूल मधील इयत्ता आठवी स्कॉलरशिप सन २०२३ - २४ या वर्षीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शिका 'क्लृप्त्या  आणि सूत्रे'  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका  - पंढरीनाथ राणे, या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर  अरुण घाग, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक  नुरा शेख, गुरुकुल प्रमुख  संतोष ठाकरे व फेलोशिप  फेलो  शशिकला पाटील ,भोईर आर.पी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. आणि विद्यार्थ्याना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . तसेच स्कॉलरशिप परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा देखील सराव होण्यासाठी लागणारे प्रश्नपत्रिका संच यांचे वाटप देखील फेलोशिप मधून  करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post