महाराष्ट्र वेदभुमी

उरणची श्वेता कडू बनली मिसेस महाराष्ट्र

 


इंडियाज मोस्ट टॅलेंटेड आणि इंडियाज मोस्ट ब्युटीफुल स्किन या उपाधीनेही ती सन्मानित

उरण (अजय शिवकर)

एक छोटीशी मुलगी..  जिचे वयाच्या सातव्या वर्षापासून स्वप्न होते की, आपणही कोणत्यातरी ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेऊ आपणही मिस इंडिया बनू, पण घरची बेताची परिस्थिती, शिक्षण सुद्धा घेणं अवघड होतं, टीव्हीवर येणारे आवर्ड शो  यांचे तिला आकर्षण होऊ लागलं, तिच्या घरात टीव्ही सुद्धा नव्हता, परंतु शेजाऱ्यांच्या घरी जाऊन ती न चुकता पाहू लागली.

तिला ग्ल्यामर आणि मनोरंजनाची खूप आवड होती परंतु घरच्या परिस्थितीमुळे तिला काही शक्य नव्हते, अशातच लहान वयात तिचे लग्न झाले आणि सारे स्वप्न स्वप्नातच विरून गेले...

पण तिने कधी हार नाही मानली, जिद्द नाही सोडली, आपण काहीतरी नक्की करायचं, नाव मिळवायचं ..मोठे व्हायचं.. तिने आत्मविश्वासाने हा निर्धार केला आणि तिच्या स्वप्नांना पुन्हा पंख फुटले.. परत एकदा तिने नव्याने काम करायला सुरुवात केली, आणि येणाऱ्या सर्व संकटांना मात करून अथक प्रयत्नाने आणि घरच्या सर्वांच्या सहयोगामुळे तिच्या प्रयत्नाला यश आलं.. आणि ते म्हणजे दिल्ली मधून झालेल्या तिस्का मि .आणि मिसेस स्पर्धेतील आत्ताची "मिसेस महाराष्ट्र २०२३" हा मिळालेला तिला किताब.....

उरण तालुक्यातील नवघर गावातील श्वेता राजकुमार कडू हिच्या अथक प्रयत्नामुळे व तिचे पती जेएनपीटी इंजिनियर राजकुमार कडू त्यांच्या निरंतर सहयोगामुळे तिला मिसेस महाराष्ट्र हा किताब घेता आला...श्वेताला एक मुलगी सारा आणि मुलगा अथर्व अशी दोन आपत्ते आहेत, तलाठी आत्माराम कमलाकर कडू यांची ती सून आहे.

मुलगी सारा हिने नृत्यसंयोजन केले म्हणून तिला इंडियाज मोस्ट टॅलेंटेड या किताबाने सुद्धा  नावाजले गेले. तसेच इंडियाज मोस्ट ब्युटीफुल स्किन म्हणून सुद्धा उपाधी मिळाली. तसेच ती  कथ्थक  नृत्यही  शिकत असून, ती क्लासिकल भरतनाट्यम मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ही आहे...

Post a Comment

Previous Post Next Post