महाराष्ट्र वेदभुमी

रोह्यात एक दिवसीय शिष्यवृत्ती शिबीर संपन्न...

 


शहानवाज मुकादम/रोहा

रोहा: येथील मेहेंदळे हायस्कूल येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले...दि:०१/१२/२३,रोजी रोहा येथील मेहेंदळे हायस्कूल मध्ये इयत्ता ५ वी चे शिष्यवृत्ती एक दिवसीय शिबीर संपन्न झाले..या शिबिराचे उद्घाटन करून रोहा तालुक्याचे मा.गट शिक्षणाधिकारी मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून मार्गदर्शन करुन या शिबिरातील मुलांचे कौतुक ही केले...

तसेच रोहा तालुक्यातील शिक्षक विद्यार्थी बनुन क्लृप्त्या सुत्रे लिहून घेण्यात आले...

 सदरच्या शिबीरात १००% विद्यार्थी उपस्थित होते... तसेच सुमारे ०४ ते ०५ च्या वेळेत पेपर दिल्यानंतर मा.गट शिक्षणाधिकारी मॅडम व शिक्षक मिळुन पुढील अध्यापनाचे उत्कृष्ट नियोजन केले...

 मराठी विषयासाठी ४,गणित विषयासाठी ८,इंग्रजी विषयासाठी ४ तर बुध्दिमत्ता चाचणी या विषयासाठी ८, या प्रमाणे शिक्षक दर आठवड्याला दोन दिवस मार्गदर्शन करण्याचे नियोजन केले आहे...

याप्रसंगी शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले असून उपस्थित सर्वांचे आभार मानून सदरचे शिबीर संपन्न झाले...

Post a Comment

Previous Post Next Post