शहानवाज मुकादम/रोहा
रोहा पोलीस आणी न्हावे गाव तंटामुक्त अध्यक्ष यांनी घेतली पत्रकाराची मदत...
रोहा: तालुक्यातील न्हावे येथील ९ महिन्याच्या प्रेग्नंट आरोग्य सेविकेस शिवीगाळ व दमदाटी दिल्याने सेविकेची तबीयत खालवल्याने गावातील रिक्षाचालकांनी दहशतीमुळे रुग्णालयात जाण्यास दिला नकार,चणेरा बिटचे पोलीस हवालदार महेंद्र शिद व पोलीस हवालदार शिद या दोन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रोहा पोलीस व न्हावे गावचे तंटामुक्त अध्यक्ष यांनी खैरेखुर्द गावातील पत्रकार शहानवाज मुकादम यांची मदत घेऊन प्रेग्नंट आरोग्य सेविकेला रोहा रुग्णालयात पाठविण्यात आले...
आरोग्य सेविका शाहीस्ता रिहान फिरफिरे ह्या आरोग्य वर्धनी उपकेंद्र न्हावे या ठिकाणी आरोग्य सेविका म्हणून नोकरी करीत आहे...
फिर्यादी ने रोहा पोलीसांना दिलेल्या जबाबात फिर्यादीची आई आणि आरोपी हेमांगी हेमंत ठाकूर यांच्यात यापुर्वी वाद असल्याने आरोपी नेहमीच फिर्यादी यांच्यासोबत तिरस्कार करीत असते, फिर्यादी दि:२२/१२/२३,रोजी सकाळी ११.वा.च्या सुमारास आरोग्यवर्धनी उपकेंद्र न्हावे या ठिकाणी जात असताना आरोपी हेमांगी ठाकूर या रोडवरील खडी तीच्या घरी घेऊन जात होती, फिर्यादी ९ महिन्याची प्रेग्नंट असल्याने सदर ठिकाणाहून सावकाश जात असतानाच आरोपी खडी घेऊन जात असल्याची विडिओ शूटींग करीत असल्याचा गैरसमज करून आरोपीने मोबाईल मागीतला,फिर्यादीने कोणतीही शूटींग केले नसलेने आरोपीने मोबाईल सह फिर्यादीस धक्का दिल्याने फिर्यादी खाली पडल्या व आरोपी हीने वाटोळा करीन असे बोलून निघुन गेल्या, त्यानंतर फिर्यादी हॉस्पिटलमधील काम उरकुन घरी जात असताना पाहून आरोपी रोडवर येवुन पहारे करण्यास फेऱ्या मारते असे बोलून निघुन गेली...
सायंकाळी ०५:३० वा.सुमारास फिर्यादी घरी जात असताना आरोपी १) हेमांगी हेमंत ठाकूर २) गोविंद महादु साळवी दोघे राहणार न्हावे फिर्यादीच्या घरासमोरून जात असताना फिर्यादीचा नवरा कसा फॉरेनला जातो तसेच फिर्यादीची नोकरी घालवतो असे बोलून आरोपी यांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी कलम ३२३,५०४,५०६,३४ अन्वये रोहा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक, प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनात पो/ह कैलास बेल्हेकर करीत आहे...न्हावे गावातील तंटामुक्त अध्यक्ष जगदीश गोमतांडेल यांनी न्हावे गावात कायदा सुव्यवस्थेबाबत तसेच शांतताभंग करुन दहशत निर्माण करणे, खोटे तक्रारी करणे अशा अनेक विषयाने न्हावे गावाची जिल्ह्यात बदनामी होत आहे...
तसेच आरोग्य सेविका म्हणून शाहिसता फिरफिरे ह्या गोरगरिबांना चांगली सेवा देत असुन तीच्यावरील होणारे अन्यायाविरुद्ध आम्ही न्हावेंकर तीच्यासोबत आहोत.
तसेच पोलीस प्रशासनाकडून न्हावे गावात शांतता मिटींग आयोजित करून सदर विषयीदखल घेऊन योग्य कारवाई करण्यात यावी आशी मागणी लेखी करणार असल्याचे तंटामुक्त अध्यक्ष जगदीश गोमतांडेल महणाले.
