माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
दि.१२डिसेबर.( इंदापूर )
दिनांक ११ व १२ डिसेंबर २०२३ रोजी एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूरमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते श्री.दिनेश पवार, यांनी सुरवातीस सरस्वती पूजन,मशाल पेटवून केली...
या कार्यक्रमात इयत्ता ९वी, १०वी आर.एस.पी.च्या विद्यार्थ्यांनी परेड प्रदर्शन केले.इयत्ता नर्सरी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ओढणी,दोरीउडी, सायकल,खुर्ची, तलवार, झेंडे यासारख्या वस्तू वापरून विविध कलेचे प्रदर्शन करणारे आकर्षक कवायती व कराटे प्रात्यक्षिक करून दाखवले.श्री दिनेश पवार यांनी क्रीडा स्पर्धांविषयी मार्गदर्शन केले..तसेच या कार्यक्रमाला उपस्थितीत माणगाव एज्युकेशन ट्रस्ट जॉइंट सेक्रेटरी व इंदापूर ब्रांच इन्चार्ज श्री अमोल कुळकर्णी सर यांनी सुद्धा शालेय क्रीडा स्पर्धा महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले... विद्यार्थांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये (सांघिक व वैयक्तिक खेळ ) सहभाग दर्शविला.या क्रीडा महोत्सवाला माणगाव एज्युकेशन ट्रस्ट मेंबर,स्कूल कमिटी चेअरमन सौ.संपदा कुळकर्णी मॅडम उपस्थित होत्या. शाळेतील हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रंजीता जाधव मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संचिता जाधव मॅडम तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या इन्चार्ज संपदा पाटील मॅडम, शाळेच्या एडमिनिस्ट्रेटिव्ह इन्चार्ज सौ.मधुरा खातू मॅडम, शाळेचे कोऑर्डिनेटर श्री मनीष देशमुख सर, स्पोर्ट्स इन्चार्ज शिल्पा मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. आनंद व उत्साहाच्या वातावरणात हा क्रीडा महोत्सव कार्यक्रम पार पडला...
