महाराष्ट्र वेदभुमी

वीरशैव लिंगायत समाजाचे वधू-वर पालक परिचय मेळावा.

 


उरण दि १७(विठ्ठल ममताबादे)

गळ्यात इष्टलिंग, कपाळाला भस्म व भगवान शिवाला आराध्य दैवत मानणारा, शैव संस्कृतीचे आचरण,पालन करणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे या सामाजिक संस्था कार्यरत असून या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २४/१२/२०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, ठाकुर्ली (पु.)डोंबिवली (ठाकुर्ली रेल्वे स्टेशन पासून २ मिनिटाच्या अंतरावर )येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व जाती पोट जातीतील इच्छुक वधू वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वधू वर मेळाव्याचे ३४ वे वर्ष आहे. इच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 

अध्यक्ष शांतकुमार लच्याने- ७७१९८२२९९४, 

कार्याध्यक्ष प्रदीप निलाखे -९०२९२४८७१३,

उपाध्यक्ष बसवंतराव अळगी -९६६४१४२४१२,

उपाध्यक्ष शिवानंद संकपाळ -८३५६००७१२५ 

यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post