रोहा दि. २१ नोव्हें. प्रतिनिधी ;-
रोहा, मुरुड, तळा, अलिबाग या तालुक्यातून ४ हजार मुस्लिम बांधवांची उपस्थिती
रोहा शहरात रविवार १९ व २० असे सलग दोन दिवस मुस्लिम समाज बांधबांच्यावतीने धार्मिक इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर धार्मिक मेळावा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत पार पडला असून सोमवारी सायंकाळ नंतर दुवा संपन्न झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. रोहयासह तळा, मुरुड, अलिबाग इत्यादी तालुक्यातील प्रमुख मंडळींचे सहकार्य लाभले.तर रोहा, मुरुड, तळा, अलिबाग या तालुक्यातील जवळपास ४ हजार मुस्लिम बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली...
रोहयात मुस्लिम समाजाचा धार्मिक इज्तिमा शांततेत व शिस्तबद्धपणे साजरा
रायगड जिल्ह्यात तळोजा, गोरेगाव ता माणगाव व रोहा अशा तीन ठिकाणी इज्तिमा म्हणजे धार्मिक मेळावे पार पडले... या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक मौलवीनी उपस्थिती मुस्लिम समाज बांधवांना मौलिक मार्गदर्शन केले...अलल्हा परमेश्वर हाच जगाचा एकमेव पालनकर्ता आहे. त्यामुळे अलल्हाची प्रार्थना करण्यासाठी व विखूरलेल्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहत आणण्यासाठी तसेच समाज सुधारणा करिता अलल्हाने संपूर्ण सुष्टीवर सव्वा लाख प्रेषितांद्वारे इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे. इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित मोहंमद सअवस.यांनी इस्लाम धर्माची दिलेली शिकवण व शिस्त सर्व दूर पोहचविण्यासाठी त्यांचे अनुयायी तबलीग जमात हे काम इज्तिमाच्या माध्यमातून करीत आहेत... इस्लाम धर्माची शिकवण व नियमांचे पालनकर्ते झाल्यास अल्ल्हा त्यांच्यावर प्रसन्न होईल. याकरिता नबी करिम यांच्या नियमानुसार चालणे क्रमप्राप्त असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मौलाना जावेद यांनी दिली. यावेळी अनेक मौलवी व हाफीज यांनी इज्तिमा कार्यक्रम विषयी सविस्तर माहिती दिली... जेष्ठ समाजसेवक खालिद बेबन यांची मेळावा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती... त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला रोहा खालचा मोहल्ला, वरचा मोहल्ला, मिल्लतनगर, जमातुल मुस्लिम अष्टमी तसेच तळा, मुरुड, अलिबाग इत्यादी तालुक्यातील प्रमुख मंडळींचे सहकार्य लाभले.तर रोहा, मुरुड, तळा, अलिबाग या तालुक्यातील जवळपास ४ हजार मुस्लिम बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली... कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी जातीने मेहनत घेतली.रोहा तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप अप्पा देशमुख, नितीन परब, संदीप सरफळे, राजेंद्र जाधव, प्रशांत देशमुख आदी समाज बांधव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या...
फोटो केप्शन : इज्तिमा मेळाव्यात सायंकाळी मगरीबची नमाज अदा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमलेले मुस्लिम समाज बांधव
