महाराष्ट्र वेदभुमी

दुर्गराज गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण!


रोहा दि १७ नोव्हें. प्रतिनिधी ;- 

शिवमुद्रा गृप आदर्शनगर, मुकुंद नगर मित्रमंडळ, शिवऊर्जा मित्र अंधारआळी ठरले मानकरी



रोह्यातील दुर्गराज गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रोठ गावात मोठ्या जल्लोषात पार पडला. या स्पर्धेत भुवनेश्वरच्या 'शिवमुद्रा गृप आदर्शनगर'ने ७ हजार रुपया चे प्रथम पारितोषिक पटकावले. तर अष्टमीच्या मुकुंद नगर मित्रमंडळाने ५ हजारांचे द्वितीय तर अंधारआळी येथील शिवऊर्जा मित्र मंडळाने ३ हजार रुपयाचे तिसरे पारितोषिक पटकावले आहे...

दिवाळीच्या काळामध्ये तालुकास्तरावर वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेली ही तालुक्यातील सर्वात मोठी ऑनलाईन गडकिल्ले बांधणी स्पर्धा होती. यामध्ये संपूर्ण तालुक्यातील तब्बल ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले, स्वराज्य निर्माण करताना त्यांनी कसा पराक्रम गाजवला आणि त्यांचे कार्य नवीन पिढीला समजावे तसेच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने‘मैत्री प्रतिष्ठानच्या' व्यासपीठाच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली होती. संपूर्ण तालुक्यात या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी बनवलेले किल्ले एकापेक्षा एक सरस आणि परिक्षकांचीच परीक्षा पहायला लावणारे होते. अशा परिस्थितीत परीक्षक प्रशांत बर्डे, राम महाडिक, दिपेश साळुंके या परीक्षकांनी हे अवघड काम पूर्ण केले. पारितोषिक स्विकारण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संघाचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता. शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासाची माहिती मिळण्यासोबतच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल, अशी अपेक्षा यावेळी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश वारंगेयांनी व्यक्त केली. तसेच बक्षीस न मिळालेल्या स्पर्धकांनी नाराज न होता पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करून स्पर्धेत उतरावे, असे आवाहन तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर तालुका प्रमुख समिर शेडगे, रोठ गावाचे सरपंच नितीन वारंगे, दानशमंद कंपनीचे मॅनेजर जाधव, अंशुल कंपनीचे मॅनेजर किशोर तावडे, मझदा कंपनीचे मॅनेजर नरेश बिरगावळे, रोहा डाय कंपनीचे मॅनेजर विकास दिघे, विधीडाय कंपनीचे मकरंद बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते...

या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक- जय हनुमान मित्र मंडळ राजेवाडी. गडकिल्ले संवर्धन विशेष योगदान विशाल तेलंगे-अध्यक्ष, शिव शंभो प्रतिष्ठान, नाना दळवी-अध्यक्ष, शिव ऊर्जा मित्रमंडळ उत्तेजनार्थ- बाळ गोपाळ मित्र मंडळ धनगर आळी. उत्तम किल्ले बांधणी- स्वराज मोहिते ग्रुप.शंतनु गोरीवले ग्रुप. उत्तम किल्ले माहिती सादरीकरण- सृष्टी नथुराम साळवी. यश विनोद पाटील, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मैत्री प्रतिष्ठान रोहाचे संस्थापक अध्यक्ष निलेश शेठ वारंगे, महेश खांडेकर, नारायण चितळकर, राजेश काफरे, अक्षय वारंगे, भारत वाकचौरे, प्रितम डोईफोडे, चेतन ओमले, प्रमोद पाटील, निखिल बेर्डे, नवनीत ठाकूर, भरत महाडिक आदींनी परिश्रम घेतले..

Post a Comment

Previous Post Next Post