महाराष्ट्र वेदभुमी

रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे आयोजन ओबीसींच्या न्यायहक्कासाठी

कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

ऊठ ओबीसी जागा हो ओबीसी आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात लढा उभारण्यासाठी समाजासाठी धागा हो ओबीसी नाही तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी तर तमाम ओबीसींच्या न्यायहाक्कांसाठी ओबीसींचे राजकीय आरक्षण पर्ववत करा, जातनिहाय जनगणना करा, पदोन्नती, मेगाभरती, ओबीसींची अनुशेष भरती करा,या प्रमूख माण्यांसाठी राज्यात पुन्हा एकदा ओबीसी समाज एकटवत असून यासाठी गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी चेंढेरे अलिबाग येथे रायगड जिल्हा ओबीसी कार्यकारणी सभा ओबिसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकारणी आणि ओबीसी पदाधिकारी यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष सुरेश मगर यांनी केले आहे...

महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आरक्षणाचा आंदोलन चालू आहे... या पार्श्वभूमीवर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आधीच ओबीसी प्रवर्गात असलेल्या साडेतीनशे पेक्षा जास्त जातींना २७ टक्के आरक्षण दिले गेले आहे. या सत्तावीस टक्के आरक्षणापैकी काही जिल्ह्यात १९ टक्के काही जिल्ह्यात त्या खालोखाल आरक्षण देण्यात आले आहे..  त्यामुळे आधीच ओबीसी प्रवर्ग ५२ टक्के पेक्षा जास्त असताना आरक्षण त्यामानाने कमी आहे...असे असताना मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आला तर या आरक्षणात मराठा समाज ओबीसीचे आरक्षण गिळंकृत करेल एवढे निश्चित त्यामुळे ओबीसी जन मोर्चाच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेली कित्येक वर्ष सुरू आहे. ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांतची बावकर, उपाध्यक्ष जेडी तांडेल, मा.आ. दशरथजी पाटील यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत परंतु शासन जातीनिहाय जनगणना करण्यासाठी उत्सुक नसल्याने पुन्हा एकदा राज्यातील ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन आपल्या हक्कासाठी लढा देण्याची गरज आहे त्यामुळे प्रत्येक ओबीसी बांधवाला आपल्या आरक्षणाचा लाभ मिळेल...

राज्यभर मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी नेते, ओबीसी पदाधिकारी यांना धमक्या देणे, घरावर हल्ले करणे आधी प्रकार चालू आहे हे थांबवण्याची तसेच ओबीसींच्या गेली अनेक वर्षांच्या मागण्या प्रलंबित असल्याने याची शासन दरबारी नोंद घ्यावी या अनुषंगाने ही जिल्हा कार्यकारनीच्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष मगर यांनी दिली आहे...

तसेच सभेसाठी विशेष मार्गदर्शन करण्याकरिता चंद्रकांतजी बावकर - कार्याध्यक्ष ओबीसी जनमोर्चा,अरविंदजी डाफळे- सरचिटणीस ओबीसी जनमोर्चा,जे डी तांडेल- उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा,माजी आमदार दशरथ दादा पाटील - ओबीसी नेते,कृष्णाजी वने - चिटणीस ओबीसी जनमोर्चा, रायगड जिल्हा ओबीसी महिला अध्यक्षा सौ अक्षरा कदम,आदी ओबीसी नेत्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभणार आहे तसेच सभेचे ठिकाण - कर्णिक हॉल पंत नगर चेंढरे अलिबाग.या ठिकाणी  गुरुवार, दिनांक - ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता.या सभेचे आयोजन करण्यात आले असून वरील तिन्ही विषयासह अन्य  विषय ओबीसी आरक्षण या पार्श्वभूमीवर या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी ०९ नोव्हेंबर रोजी अलिबाग येथे जिल्हा स्तरीय बैठक आयोजित करण्यात आले आहे या बैठकीसाठी ओबीसी अंतर्गत येत असलेल्या सर्व जातींचे रायगड जिल्ह्यातील कोकण अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांनी आपल्या कार्यकारणीसह व  ओबीसी जन मोर्चा रायगड जिल्हा कार्यकारणी, तालुका अध्यक्ष यांनी बैठकीसाठी उपस्थित राहून आपल्यावर येऊ घातलेले संकट, आपल्याअधिकारावर घाला घालणाऱ्या च्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन रायगड जिल्हा ओबीसी सेल चे समन्वयक सुरेश मगर यांनी केले असून यासाठी अशोकजी पाटील जिल्हा सरचिटणीस ओबीसी जन मोर्चा रायगड जिल्हा,निलेशजी थोरे जिल्हा युवक अध्यक्ष ओबीसी जन मोर्चा रायगड जिल्हा हे अधिक परिश्रम घेत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post