महाराष्ट्र वेदभुमी

कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही -आमदार महेंद्र शेठ दळवी


अलिबाग (सचिन पाटील)

४१ मंदिरांना दिले कळस पुढेही पुण्याचा काम करत राहणार-आ. महेंद्र शेठ दळवी 

श्रीगाव येथील मरीदेवी सामाजिक मंदिर सभागृहाचा  लोकार्पण सोहळा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी व जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला... यावेळी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही.. यापुढे पक्षभेद न करता सर्वसामान्यांची कामे करतच राहणार कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून जी विकास कामे चालू आहेत ते खूप सुंदर रित्या चालू असून या जिल्हा परिषद मतदार संघात राजा केनी यांच्या नेतृत्वाखालीच जो सर्व सामान्यांचा विकास चालू आहे तो अत्यंत सुंदरपणे चालू असून राजा केणी यांचे जी कार्यकर्त्यांची फळी आहे ती उत्कृष्ट फळी असून शेतकरी कामगार पक्षाला नामोहरन करण्यासाठी या ठिकाणी आणखी विकास कामे करून सर्वसामान्यांचा विकास साधणार असेही आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी या ठिकाणी सांगितले...आत्तापर्यंत ४१ मंदिरांना कळस दिले असून यापुढेही पुण्याचा काम करतच राहणार...

कार्यकर्त्यांच्या बळावरच श्रीगाव ग्रामपंचायत वर भगवा फडकवणार-जिल्हाप्रमुख राजाभाई केणी 

श्री गाव येथील तरुणांनी एकत्र येऊन विकास कामांची मागणी केली होती ते आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेली सर्व विकास कामे आपण या ठिकाणी केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून हे सामाजिक सभागृह अत्यंत सुंदररीत्या या ठिकाणी बांधलेला आहे...आणि यापुढे श्रीगाव गावातील तरुणांच्या मागे मी ठामपणे उभा असून ते सुचवतील ती कामे या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीत करणार असून श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीत तरुणांचे उत्कृष्टरित्या योगदान आहे... या कार्यकर्त्यांच्या बळावरच श्रीगाव ग्रामपंचायत वर भगवा फडकवणार असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी केले...

श्रीगाव ग्रामपंचायत हद्दतील व गावातील शेकडो ग्रामस्थ यावेळी कार्यक्रमास उपस्थित

कार्यक्रमास सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी महिला आघाडीच्या रेश्मा जोशीउ, उपतालुका प्रमुख विकास निळकर , हरिचंद्र म्हात्रे,जीवन पाटील, उत्तम शेठ पाटील,आंबेपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच शैलेश पाटील,  प्रमोद पाटील,हृदयनाथ पाटील, महेश वावेकर,अक्षय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सुरेश पाटील यांनी सुंदररित्या केले... श्रीगाव ग्रामपंचायत हद्दतील  व गावातील शेकडो ग्रामस्थ यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post