रोहा/शहानवाज मुकादम, दि:२५/११/२०२३,
रोहा पोलीसांची फसवणूक,खोटी फिर्याद,मानसिक, शारिरीक,बदनामी झाल्याप्रकरणी आरोपीने केली कारवाईची मागणी...
रोहा तालुक्यातील न्हावे येथे घरात घुसुन महिलेला मारहाण करून विनयभंग प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, तर रोहा पोलीसांना खोटी माहिती देऊन फसवणूक करीत खोट्या गुन्ह्यात आडकवुन बदनाम केल्याप्रकरणी आरोपीने फिर्यादीचे कॉल लोकेशन,सीसीटीवी फुटेज तपासून कारवाईची मागणी केली आहे...
महिलेने रोहा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून,गुन्हा दाखल
सदर प्रकरणी दि:२१/११/२३,रोजी फिर्यादी महिला घरात साफसफाई करीत असताना वेळ २०.४५वा. च्या दरम्यान आरोपी क्र.१ व २ यांनी मागील वादाचा राग मनात धरून संगमत करुन फिर्यादी यांचे घरात घुसुन फिर्यादीस हाता बुक्क्याने मारहाण,विनयभंग,नुकसान,शिवीगाळ,व धमकी दिल्याने सदर महिलेने रोहा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून,दि:२२/११/२३,रोजी कॉं.गु.र.नं.-१७८/२०२३ भा.द.वि.क. ३५४, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी फिर्यादी विरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केला असून शेकटाचे झाड तोडले या विषयावर दि:२१/११/२३,रोजी संध्या,०५.३०वा.च्या दरम्यान न्हावे गावचे तंटामुक्त अध्यक्ष व मा.सरपंच फिर्यादी यांचे आईवडील उपस्थितीत असताना झाडाच्या विषयासंदर्भात वाद झालेला असताना त्याप्रसंगी फिर्यादी महिला गावात नव्हती... सरपंच यांनी सदर विषयात समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी यांच्या वडीलांनी फिर्यादीस मुंबई येथे फोनवरून कामालाच लावणे आहे... असे बोलून फिर्यादिस बोलवणा केल्याचे आरोपी यांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर महिलाचे कॉल लोकेशन व न्हावे चणेरा आणि रोहा येथील सीसीटीवी फुटेज तपासणी व फिर्यादी महिलेने पोलीसांना खोटी माहिती देऊन फसवणूक करून आरोपीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन बदनामी झाल्याचे फिर्यादीविरुद्ध चौकशीअंत कारवाईची मागणी आरोपीने केली आहे...
सदर प्रकरणी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्हावे गावात शांतता...
फिर्यादी व आरोपी यांच्यात गावठाण जागेवरून जुना वाद आहे... सदर घटने प्रकरणी गावातून आरोपी व फिर्यादी या दोन्ही गटातील व्यक्तींविषयी कोणत्याही प्रकारची लोकांकडून काहीही प्रतिक्रिया मिळालेली नाही...
सदर गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस निरीक्षक,श्री प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनात पोसई/हिवरकर करीत आहे...