महाराष्ट्र वेदभुमी

उपसरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे श्री प्रसन्ना सदानंद सिनकर



शहानवाज मुकादम/रोहा

श्री प्रसन्ना सदानंद सिनकर यांचा २ मताने विजयी उपसरपंच पदासाठी निवड

दि:१७/११/२०२३ रोजी तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली... या निवडणुकीत थेट सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवारांनी शुक्रवारी दि:१७/११/२३, रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला... तसेच यावेळी उपसरपंच निवडणूकही घेण्यात आली... ठिकठिकाणी जल्लोषात कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांचे स्वागत केले...


रोहा तालुक्यात ५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते... तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडली... आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडल्याने ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाच्या झेंडा फडकावा यसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती... नवनियुक्त सरपंचांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला... यावेळी ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक घेऊन उपसरपंच निवड करण्यात आली...

मात्र चणेराविभागातील कोकबण,नहावे,खांबेरे या तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने विजय मिळविला, तर चणेरा ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकवला... चणेरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली...

 या निवडणूकीमध्ये दोन अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाले असून श्री प्रसन्ना सदानंद सिनकर यांचा २ मताने विजयी झाला...श्री सिनकर यांची उपसरपंच पदासाठी निवड झाल्याचे नवनिर्वाचित सरपंच श्री राजु (राजेंद्र) इंदुलकर यांनी जाहिर केले...चणेरा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री सिद्द याच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक पार पडली...

Post a Comment

Previous Post Next Post