महाराष्ट्र वेदभुमी

कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांच्या वाढदिवस


पुगाव - रोहा (नंदकुमार कळमकर) 

पुगाव गावचे सुपुत्र कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शैक्षणीक साहित्य वाटप.

रोहा तालुक्यातील वाढदिवसाचे औचित्य साधून येथिल शंकरराव म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थी वर्गाला शालेय शैक्षणीक साहित्य तसेच मल्लखांब लाटी काठी बनाटी खेळाचे साहित्य युवकांना वाटप करण्यात आले... 


यावेळी शंकरराव म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश म्हसकर,गोवे ग्राम पंचायतीचे उपसरपंच नितीन जाधव,रोहा तालुका कुणबी समाजाचे उपाध्यक्ष मारुती खांडेकर सर, पपत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे, पुगाव ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ नेहा म्हसकर, उपसरपंच नीलम कळमकर,हरिश्चंद्र धामणसे तंटामुक्ती अध्यक्ष,सौ रचना कळमकर,सौ आदिती झोलगे, राम धूपकर, अनिता खामकर,नारायण अधिकारी,आनंता म्हसकर,जनार्धन खामकर,सुनील म्हसकर, विट्टल येळकर ,घनश्याम बागुल, गीतांजली देवकर, ऋतुजा देशमुख, विलास म्हसकर, नंदकुमार मासक, विनायक म्हसकर,रमेश देशमुख, राजेंद्र देशमुख, चंद्रकांत अधिकारी,रविंद्र म्हसकर,मयूर मोरे,शोभा देशमुख,विजय म्हसकर एकनाथ लहाने सह पुगाव ग्रामस्थ व महिला व तरुण वर्ग आदी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते...कुणबी समाजाचे वैभव समाज नेते शंकरराव म्हसकर यांच्या ७० व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ५ नोव्हेबर रोजी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन शंकरराव म्हसकर सामजिक प्रतिष्ठानच्या वतीने कै. हरिभाऊ म्हसकर सामाजिक सभागृह पुगाव येथे आयोजित करण्यात आले होते तर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार, शालेय शैक्षणीक साहित्य तसेच मल्लखांब लाटी काठी खेळातील युवक युवती यांना देखील या खेळाच्यासाठी साहित्य वाटप करण्यात आले...सदरच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी लाभले मान्यवर मारूती खांडेकर सर, सेवा निवृत्त शिक्षक येलकर गुरुजी, कु.श्रृती म्हसकर, घनश्याम बागुल, प्रतिष्ठानचे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश म्हसकर, आदींनी उपस्थीत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले... कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रचना कळमकर यांनी तसेच चंद्रकांत आधिकारी केले तसेच बबन म्हसकर यांनी या कार्यक्रमाचे आभार मानून सांगता करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post