महाराष्ट्र वेदभुमी

बातमी मागील बातमी .वृत्तपत्र बातमीची दखल पोलिस पाटलांचा मानधन खात्यात जमा, सरकारला आली जाग




कोलाड (श्याम लोखंडे)  

पोलिस पाटलांचा मानधन खात्यात जमा,व्यक्त केले साऱ्यांनी मनापासून वृत्त पत्राचे आभार

रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पोलिस पाटील यांना गेली पाच महिने उलटून गेले होते तरी त्यांच्या हक्काच्या मानधन वेतनाचा पत्ता नाही ऐन दिवाळी तोंडावर आली असताना त्याच्यावर उपासमारीची वेळ हे बातमी वृत्त प्रतिनिधी यांना समजताच वृत्त पात्रात प्रसिद्ध होताच याची दखल घेत पाच महिन्यातील तीन महिन्यांचा मानधन वेतन दिवाळी भाऊबीजेच्या एक दिवस आधी सोमवारी सायंकाळपर्यंत शासनाने बँक खात्यात जमा केले आहे.. तसेच ऐन दिवळीत मानधन मिळाले असल्याने वृत्त पेपरचे तसेच प्रतिनिधी आणि शासनाचे मनापासून पोलिस पाटील तसेच त्यांच्या संघटनेच्या वतीने आभर व्यक्त करण्यात आले आहेत...

भाऊबीजेच्या एक दिवस आधी पोलिस पाटलांचा ३ महिन्यांचा मानधन ६ हजार ५०० प्रमाणेच बँक खात्यात जमा 

खणखणीत वृत्त पात्राच्या बातमीने सर्व सामान्य जनतेच्या सरकारला आली जाग भाऊबीजेच्या एक दिवस आधी पोलिस पाटलांचा तीन महिन्यांचा मानधन प्रति महिना ६ हजार ५०० प्रमाणेच सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे बँकेतून मेसेज येताच मानले वृत्तपत्राचे तसेच शासनाचे मानले आभार .महाराष्ट्रातील माय बाप राज्य सरकारने राज्यातील कार्यरत असणाऱ्या तमाम पोलिस पाटील यांचे पाच महिन्यांचे मानधन वेतन रखडवले होते मागील जुन महिन्यांपासून ऐन दिवाळीत मानधन वेतन पासून वंचित राहिलेले गाव कारभारी पोलिस पाटील यांना यांना मानधन आज मिळेल उद्या मिळेल या प्रतीक्षेत पाच महिने उलटून गेले दिवाळी तोंडावर आली असताना त्यांच्या मानधन वेतन मागणीची बातमी प्रसिद्ध होताच त्याची शासनाने दखल घेत तीन महिन्याचे एकत्रित रक्कम खात्यात जमा केले आहे त्यामुळे अखेर सरकारच्या वतीने दिलासा मिळाला रखडलेल्या पाच महिन्याच्या मानधनावर थकीत तीन महिन्यांचा मानधन मिळाले असल्याने सर्व पोलिस पाटील बांधव तसेच त्यांच्या संघटनेच्या वतीने वृत्त पत्राचे व प्रतिनिधींचे आणि शासनाचे आभार मानून अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया 

वृत्त पत्राचे आणि शासनाचे मनःपुर्वक आभार रायगड जिल्ह्यात एकूण ९५० तर रोहा तालुक्यात एकूण ९० पोलीस पाटील पद कार्यभार सांभाळत आहेत त्यात काही गावात पोलीस पाटील यांच्या जागाही अद्याप रिक्त असल्याने शेजारील गावातील पोलीस पाटील यांच्यावर हा अतिरिक्त भार तुटपुंज्या मानधनावर कार्यभार सांभाळत आहेत त्यात गेली पाच महिने आम्हा पोलिस पाटील यांना मानधन वेतन मिळाला नसल्याने उद्या दिवाळी सण असल्याने वंचित राहिलो परंतू येथिल बातमीदार यांनी वृत्तपत्रांत आमच्या थकीत मानधन याचे वृत्त प्रसिद्ध करताच शासनाने त्याची दखल घेत गेली पाच महिन्याच्या आधीन तीन महिन्याचे मानधन उद्या भाऊबीज एक दिवस आधी बँकेत जमा झाले आहे त्यामुळे आम्ही सर्व पोलिस पाटील वृताचे व बातमीदाराचे तसेच शासनाचे आभारी असल्याचे सुनील कासार, अध्यक्ष रोहा तालुका पोलीस पाटील संघटना यांनी सांगितले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post