महाराष्ट्र वेदभुमी

बातमी बातमी मागील बातमी भावना घोसाळकर हिचा दुर्दैवी मृत्यू! रोहा भुवनेश्वर येथील सिलेंडर स्फोटातील जखमी


शहानवाज मुकादम/रोहा

सिलेंडरचा स्फोटात कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना

तालुक्यातील भुवनेश्वर येथे राहणारे मनोहर घोसाळकर यांच्या घरी सोमवारी सिलेंडरचा मोठा स्फोट झाला असुन त्या स्फोटात कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती...

त्यातील जखमी भावना घोसाळकर वय २२ हया तरुणीचा मुंबई हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान अंत झाल्याचे समोर आले... खूपच वेदनादायी घटना घडली...

स्फोटातील दुर्घटनेत मनोहर घोसाळकर, सायली घोसाळकर, भावना घोसाळकर गंभीर जखमी झाले होते, जखमींना तातडीने उपचारा साठी मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते...

जखमी भावना घोसाळकर हिचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आली आणि सबंध रोहा हादरला...

भावना घोसाळकर हिच्यावर उपचार सुरू होते,मात्र उपचाराला प्रतिसाद देणे थांबल्याने अखेर भावना घोसाळकर हिने शेवटचा निरोप दिला...

या घटनेने  सिलेंडर किती धोकादायक असू शकतो हे पुन्हा समोर आले...त्यामुळे सिलेंडरचा नीट वापर माझ्या आई ताई वहिनी महिलावर्गाने करावा...

Post a Comment

Previous Post Next Post