महाराष्ट्र वेदभुमी

आनंदाचा शिधा नाही,चणेरा विभागात ग्रामस्थांकडून नाराजी!


शहानवाज मुकादम/रोहा

पुरवठा अधिकाऱ्यांकडून राज्याचे मंत्री कु.अदिती तटकरे यांच्या हस्ते शिधावाटप,


दि:११/११/२०२३,दिवाळीनिमित्त राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना गतवर्षीप्रमाणे यंदाही आनंदाचा शिधा १०० रूपयांमध्ये देण्याची घोषणा केली आहे... 

यापूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल अशा चारच वस्तू होत्या...

 यामध्ये दोन वस्तूंची भर पडली आहे...या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे... दिवाळी झाली असताना चणेरा विभागातील विविध भागातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आनंदाचा शिधा उपलब्ध नाही...

मात्र रास्त भाव दुकानदारांनी मागणी पत्र दिल्या शिवाय आनंदाचा शिधा नाही-उज्वला अंधेरे/भोईर...

असे असताना शेडसई(भागिर्थीखार)येथील रास्त धान्य दुकानदार श्री धर्माजी कोळी यांच्या दुकानात मात्र दि:०९/११/२३, तहसील कार्यालयातील मा. पुरवठा अधिकारी श्रीमती उज्वला अंधेरे/भोईर यांच्या उपस्थितीत राज्याचे मंत्री महोदया कु.अदिती तटकरे यांच्या हस्ते शिधावाटप करण्यात आले,

 असे असतानाच चणेरा विभागातील रास्त भाव दुकानात अध्यापक आनंदाचा शिधा मिळाला नसलेने सामान्यांकडुन नाराजी व्यक्त होत आहे...

 पुरवठा अधिकारी श्रीमती उज्वला अंधेरे/भोईर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले रास्त भाव दुकानदारांनी मागणी पत्र दिले शिवाय अनंदाचा शिधा(धान्य) दिलं जाणार नाही आशे उत्तर अंधेरे/भोईर यांनी दिले आहेत...

शासनाकडून जरका सदरचा आनंदाचा शिधा मागणी केल्यानंतर दुकानदाराला देण्यात यावा आसे शासनाकडून जरका आदेश आसेल तर राज्याचे मंत्री महोदया यांच्या हस्ते पुरवठा अधिकाऱ्यांकडून  शिधा वाटप करण्यात यावा आसे ही आदेश आहे का?  आसा सवाल चणेरा विभागातील ग्रामस्थ करीत आहे...

मा.जिलहाधिकार रायगड,मा.तहसीलदार रोहा यांनी सदरचा शिधावाटपाचे लाभ  चणेराविभागातील गोरगरिब जनतेला मिळेल का?

पुरवठा अधिकाऱ्यांकडून राज्याचे मंत्री महोदया कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते शिधावाटप करण्यास व प्रसिद्धीस वेळ मिळत आसुन सामान्यांना या शिधावाटपा चे लाभ कसे लवकरात लवकर देता येईल या बाबत गांभीर्य दिसत नाही...

Post a Comment

Previous Post Next Post