महाराष्ट्र वेदभुमी

हातातोंडाशी आलेला घास घेतला हिरावून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 


माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर 

मुसळधार पावसाने भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान

दि.०८ नोव्हेंबर २०२३ रोजी माणगाव तालुक्या सह साई विभागामध्ये गळगडाटी वादळी वाऱ्यासह,मुसळधार पाऊस पडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.. आहे...भातशेती तयार झाली असून कापणीच्या कामांमध्ये शेतकरी वर्ग व्यस्त असतांना दि.०८/११/२०२३ रोजी अवकाळी मुसळधार पावसाने भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे...

शेतकऱ्यांला भरपाई द्यावी...अन्यथा शेतकऱ्यांचा विराट मोर्चा शासन दरबारी 

भात कापणीचे काम सुरू आहे,आणि अचानक आलेल्या या पावसाने.बळीराजाचा तोंडाचा घास हिरावून घेतला..संपूर्ण वर्षभर शेतकरी यासाठी मेहनत करत असतो आणि अवकाळी पावसामुळे हातात आलेली भातशेती  कोलमडून पडली.. शेतातून पाणी साचले असल्याने,उभ्या असलेल्या संपूर्ण पिकाची शेतामधून लोळण झाली आहे.. शिवाय कापलेल पिक तर पूर्णपणे भिजले असून शेतकरी राजा आता चिंतातुर झाला आहे...सदर अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे शासनाने त्वरित शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे व ज्या शेतकऱ्यांने विमा उतरविला आहे..त्या शेतकऱ्यांलादेखील लवकरात लवकर भरपाई द्यावी... अशी मागणी साई विभागातील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी केली आहे... अन्यथा शेतकऱ्यांचा विराट मोर्चा शासन दरबारी निघेल...

Post a Comment

Previous Post Next Post