रोहा : २६ ऑक्टो.किरण मोरे.
दै.रायगड स्वाभिमान चे मालक श्री रघुनाथ गणपत कडू यांची शेडसई ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड.
रोहा तालुक्यातील शेडसई ग्रृपग्रामपंचायत मध्ये तहकूब झालेल्या ग्रामसभेची गुरुवार दिनांक २६/१०/२०२३ रोजी ठिक दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास सभा घेण्यात आली.
ही सभा सरपंच सौ.प्रिया दिनेश कडू यांच्या अध्यक्षतेखाली सचिव /ग्रामसेवक श्री जी .एस.तरे यांनी अजंडाप्रमाणे विषय घेतले. व आयत्यावेळेस येणारे विषय अध्यक्षांच्या अनुमतीने चालवून घेण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम मुदत संपलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष त्याजागी नव्याने अध्यक्ष, सदस्य,व अन्य रिक्त पदे याबाबत निवडीचा ठराव घेतला असता महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून श्री रघुनाथ गणपत कडू यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.
श्री रघुनाथ कडू स्वतः रायगड स्वाभिमान दैनिक, साप्ताहिक, पोर्टल, बेबसाईड, युट्यूबद्वारे जनतेचे प्रश्न विनामूल्य मांडत असतात.यातून अनेक कामे पुर्णत्वात झाली तर काहींना गती मिळाली असल्याचे दिसून येते.
त्यातच ते विविध संघटणेचे प्रमुख पदाधिकारी असल्याने त्यांची प्रशासनाशी चांगले समंध काही ठिकाणी वचक निर्माण झाली आहे.गावलेवच्या अडीअडचणी, वादविवाद, सलोख्याचे कसे होतील यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील मात्र तितकेच सहकार्य तेथील नागरिकांनी द्यायला हवे असेही त्यांच्या बोलण्यातून जाणवते.नागरिकांनी साथ दिल्यास आपण ग्रामपंचायतीतील अनिष्ट ऋढी परंपरा अवैध दारू धंदे,झुगारासारखी लागलेली किड या नष्ट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेडसई ग्रामपंचाय मधील ग्रामसभेपुढील विषय खेळीमेळीच्या वातावरणात पुर्णतः घेण्यात आले तर याच वेळी आयत्या विषयावर महाराष्टाचे प्रख्यात किर्तनकार प्रबोधनकार स्व.ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची वार्ता समजताच त्यांना आदरपूर्वक उपस्थीतांनी दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मा.सरपंच सौ.प्रिया दिनेश कडू , सदस्य श्री तानाजी देवजी म्हात्रे,सदस्या राजेश्री राजन पाटील,सदस्या जनीबाई पवार,माजी सरपंच श्री पांडूरंगशेट महादू कडू,पानलोट अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर धर्माजी कोळी,ग्रामरोजगार सचिव विलास सिताराम म्हात्रे,जेष्ठ कार्यकर्ते श्री सिताराम महादू म्हात्रे,माजी तंटामुक्त अध्यक्ष व शेडसई ग्राम अध्यक्ष श्री चंद्रकांत महादेव गायकर,युवा नेता श्री दिनेश पांडुरंग कडू,श्री राजेंद्र लक्षण पाटील ,भरत म्हात्रे,ग्रामकर्मचारी कु.आकांक्षा मढवी,तसेच ग्राम पंचायतीमधील ग्रामस्थ,महिला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष श्री रघुनाथ कडू यांना सभेनंतर सरतेशेवटी सर्वांनी हस्तोंदळन देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या शुभेच्छांबद्दल धन्यवाद व आभार कडू यांनी मानले.