(१४/१०/२०२३ ऑक्टोबर) रोहा / शहानवाज मुकादम
नियमहिनता, असत्यवादिता, अपारदर्शकता या गोष्टी अनैतिकतेच्या गाभ्याशी उलघडते..
तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील मुरुम भराव टाकण्याचे खोटे इतिवृत्त तयार करुन काम न करताच बिल आदा करुन शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करून सदर कामात भ्रष्टाचार झालेला आहे...
सदर कामाचे तिन नावे असुन ठेकेदाराचे खोटे नाव व खोटी सही नमुना नंबर १२ च्या फॉर्मवर उघड दिसत असुन रक्कम दिलेल्या ठेकेदाराचे विषयी कोणतेही ठराव नसतानाच बिडिओ रोहा शुभदा पाटील यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्याचे जाणुन बुजून पर्यत्न केले आहे...
वरिष्ठांकडून चौकशीअंत कारवाईची मागणी केली असता बिडिओ रोहाकडे नियमोचित कारवाई करण्याचे पत्रव्यवहार करुन बोट दाखवतात तसेच बिडिओ रोहा राजिप कडे बोट दाखवतात...
भ्रष्टाचार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे... या समस्येचे मूळ प्रामुख्याने व्यक्तिच्या अनैतिक व्यवहारात आहे, असे मानले जाते...त्याचबरोबर व्यक्तिच्या सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेही भ्रष्टाचाराचे एक महत्त्वाचे कारण म्हणून बघितले जाते...
नियमहिनता, असत्यवादिता, अपारदर्शकता या तीन गोष्टी बरेचदा अनैतिकतेच्या गाभ्याशी असल्याचे दिसते... जेव्हा अशा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो, तेव्हा समाजामध्ये भ्रष्टाचार नावाची समस्या उद्भवते...त्याचबरोबर गुंतागुंतीची आणि आंतर्विरोधग्रस्त सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे...
भ्रष्टाचार म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत लाभासाठी स्वतःला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करणे होय...
भ्रष्टाचार म्हणजे काही औपचारिक नियम किंवा कायद्यांचे उल्लंघन करून सार्वजनिक सत्तेचा व्यक्तिगत फायद्यासाठी उपयोग करणे होय...
माझ्या मते, सार्वजनिक भूमिका अथवा कार्यालयाचे नियम आणि कर्तव्य बाजूला ठेऊन हा भ्रष्टाचार झाला असून पंचायत समिती रोहा व रायगड जिल्हा परिषदकडून कारवाई करण्याचे एकमेकांवर बोट दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाठराखण करीत आहेत...
