माणगाव प्रतिनिधी(सिकंदर आंबोणकर)
दि.२५/१०/२०२३ मु.पो.खामगाव ता.म्हसळा जि.रायगड हद्दीमध्ये जलजीवन मिशन या योजनेचं काम निकृष्ट दर्जाचे आहे...१,६१,१२,९२८ रू.ची ही केंद्र सरकारची नळपाणी या योजनेचा लाभ खामगाव मुळगाव, मोहल्ला,रोहिदास नगर, बौद्धवाडी असा असून मु.वांगणी येथील विहिरीवरून म्हसळा- गोरेगाव रस्त्याच्या बाजूने ४ इंच व्यासाच्या प्लॅस्टिक पाईप लाईन साठवणं टाकीपर्यंत आणले जाणार आहेत...पण ते पाईप कमीत कमी ३ फूट जमिनीच्या आतमध्ये गाडले गेले पाहिजेत पण ते काही ठिकाणी जमिनीच्या वरच निदर्शनास येते आहेत...शिवाय ७४ हजार लिटर साठवणं टाकीचे काम ही फार निकृष्ट दर्जाचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले असून...सदर सगळ्या गोष्टी ठेकेदाराला विचारणा केली असता त्याच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राकेश वाघरे, निलेश वाघरे व त्यांचे सहकारी परेश खडस, प्रमोद निंबरे, सिजाऊद्दीन जोगीलकर, नासिर जोगीलकर तसेच मुंबई मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी म्हसळा यांची भेट घेऊन ठेकेदाराचा सर्व प्रकार उघडकीस आणला... प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांनी भेट देऊन चालू असलेलं काम थांबवून तोडण्याचे आदेश दिले... त्याठिकाणी नवीन २ साठवण टाक्या बांधून देण्याचे ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्य केले...प्रकल्पाची साठवण टाकी बांधलीच नसून पत्र्याला पन्हळी लावून पाईपच्या साहाय्याने जमिनीवर पाणी सोडण्यात आले...खामगाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याला जबाबदार खामगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत असा आरोप वाघरे बंधुंनी केला...दोषींवर अपहाराचा गुन्हा दाखल करून ठेकेदारांना काळया यादीत टाकुन कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे ही सांगण्यात आले होते..
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
बातमी मागील बातमी.......
आरोपाचे खंडन व्हावे खामगाव सरपंचां सौ निंबरे यांनी दिले नोटीस पत्रासह प्रतिक्रिया
गेली काही दिवसापासून खामगाव तालुका म्हसळा जि रायगड हद्दीतील( हर घर नल) जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे..आणि त्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे तसेच खामगाव ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगच ठेकेद्वारामार्फत रीतसर निविदा काढुन काम केलं गेले पण त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते वाघरे बंधूनी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, त्या प्रकल्पाची साठवण टाकीच बांधली गेलेली नाही...फक्त पत्र्याला पन्हळी लावून ते पाणी पाईपच्या साहाय्याने जमिनीवरच सोडण्यात आले आहे...अशी माहिती येथील स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते वाघरे बंधू यांच्याकडून आमचे प्रतिनिधी यांना देण्यात आली होती...शिवाय संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करणार असल्याचे सांगण्यात आले होते...त्यानुसार महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनलनी दखल घेऊन आपल्या चॅनलव्दारे बातमी प्रसारित केली...याच बातमीनंतर खामगावच्या सरपंचा सौ प्रियांका प्रसन्न निंबरे यांनी महाराष्ट्र वेदभूमी न्युज चॅनलचे प्रतिनिधी यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून संबंधित कामात भ्रष्टचार झाला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.. सदर कामाशी सरपंचा निंबरे यांचा काहीही संबंध नाही असे सांगण्यात आले आहे... त्यांच्यावर आरोप करण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे असून त्याचे खंडन करण्यात यावे याकरिता त्यांनी स्वतः आपल्या स्वाक्षरीन्वये प्रेस नोट अर्ज महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनलला दिला त्यानुसार त्यांची भेट घेऊन त्यांना चॅनलच्या माध्यमातून आरोप खंडन विषयी प्रश्न विचारले असता त्यावर त्यांनी दिली प्रतिक्रिया...ती पुढीलप्रमाणे...
वरील प्रेस नोट अर्जद्वारे सौ निंबरे यांनी आपल्यावर आरोप करण्यात येत आहे..आणि त्याचे खंडन व्हावे असे स्व - स्वाक्षरी करून येते नमूद केले आहे...
प्रतिक्रिया
आपल्यावर करण्यात येणारे आरोप बीन बुडाचे असून आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही... सौ निंबारे सरपंचा खामगाव


