महाराष्ट्र वेदभुमी

रोहा पुगाव गावचे सुपुत्र रोहित निळेकर यांनी युवकांना केले टीशर्ट चे वाटप .





पुगाव - रोहा (नंदकुमार कळमकर)

 स्वर्गीय दत्ताराम पांडुरंग येळकर यांच्या प्रतिमेचे पूजन 

रोहा तालुक्यातील पुगांव गावातील मल्लखांब आखाडा हा हिंदू संस्कृतीमधील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवकालीन काळातील जिगरबाज मर्दानी खेळ आपल्या गावातील स्वर्गीय दत्ताराम पांडुरंग येळकर यांची परंपरा राखत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जय बजरंग मंडळातील मुलांनी व मुलींनी कायम जोपासली असून त्या अनुषंगाने आज दसरा मुहूर्तावर श्री हनुमान मंदिर सभागृहात श्री हनुमंतराय (बजरंग बली) ची पुजा करत त्यांनी आखाड्यातील काही शस्त्र मल्लखांब व लाठीकाठी तसेच स्वर्गीय दत्ताराम पांडुरंग येळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत गावातील वरिष्ठ ग्रामस्थांच्या व मंडळतील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत येथील युवकांना टीशर्टचे वाटप करण्यात आले...गावातील दातृत्व आणि दानशूर व्यक्ती तसेच युवकांचे आशास्थान असलेले रोहित राजेंद्र निळेकर हे विणा वर्ल्ड टूर्स चे प्रतिनिधत्व करत असून भारतीय संस्कृतीत साडेतीन मूहर्तपैकी समजला जाणाऱ्या मुहर्तपैकी एक दसरा मुहर्ताचे औचित्य साधून त्यांनी येथील दांड पट्टा लाठीकाठी खेळातील नवचैतन्य म्हणुन याप्रसंगी गावातील युवकांना टीशर्टचे वाटप केले...

कार्यक्रमाला गावातील वरिष्ठ जेष्ठ ग्रामस्थं आदी यावेळी गावातील युवक बहुसंख्येने उपस्थित 

युवकांचा मोठा उत्साह लाभलेल्या या कार्यक्रमाला गावातील वरिष्ठ जेष्ठ ग्रामस्थं रामचंद्र भोईर, राजेंद्र निलेकर, सुधीर शेळके, सुनील येळकर, हेमंत देशमुख, रोहित निलेकर, व मंडळातील सर्व सदस्य तसेच आदी यावेळी गावातील युवक बहुसंख्येने उपस्थित होते...



Post a Comment

Previous Post Next Post