अलिबाग (ओमकार नागावकर) :
जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थांनी मातोश्री येथे बांधले नवान्नतोरण
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या नवान्न पौर्णिमा दिवशीचे औचीत्य साधून आज गेली ३० वर्षाची परंपरा जोपासुन जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थांनी तमाम शिवसैनिकांचे ऊर्जास्रोत मातोश्री येथे नवान्नतोरण बांधले. सुमारे ६० इंच लांबीचे भाताच्या लोंबीचे असलेले हे तोरण असते... गणपतीनंतर कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी केली जाते...भात हे त्यापैकी एक धान्य! नवरात्रीत नुकताच कापणी करून आलेला भात जेवणात घेण्यापूर्वी किंवा बाजारात विकायला नेण्यापूर्वी देवाला त्याच तांदुळाचा भात किंवा खीर असा नैवेद्य केला जातो... त्याची पूजा केली जाते. म्हणून दसऱ्यालाही भाताच्या लोम्बी तोरणात अडकवून ते वैभवाचे प्रतीक म्हणून मानले जाते...
भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा
नवान्न पौर्णिमेच्या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते...भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा... या दिवशी नवीन तांदळाचा भात,खीर करण्याची प्रथा आहे...पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात... आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागीरी पौर्णिमा म्हणतात...तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागीरी पौर्णिमा समजले जाते...ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते...