महाराष्ट्र वेदभुमी

आरक्षणासाठी रायगड मधून राजीनामा सत्र!


रोहा दि. ३१ ऑक्टो. प्रतिनिधी :-

युवासेनेचे तालुका प्रमुख राजेश काफरे यांचा राजीनामा  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातून राजीनामा सत्र सुरू झाले असून त्यातील पहिला राजीनामा सोमवारी संध्याकाळी देण्यात आला, रोहा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवक तालुकाप्रमुख राजेश काफरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे...सदर राजीनामा देताना काफरे यांनी राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून ते मिळायलाच हवे अशी माझी व माझ्या समाजाची धारणा आहे...परंतू शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत आहे. शासनाच्या निषेधार्थ व नकारात्मक भूमिके विरोधात रोहा तालुका शिवसेना युवा सेनेच्या तालुका अधिकारी पदाचा राजेश काफरे यांनी राजीनामा पक्षश्रेष्टींकडे दिला आहे...


दरम्यान आरक्षण मिळत नसल्यामुळे राज्यातील लोकप्रतिनिधी व पक्षीय पदाधिकारी आपापले राजीनामे पक्षश्रेष्टींकडे देत असताना राजेश काफरे हे आपल्या पदाचा राजीनामा देणारे पहिले मराठा समाज बांधव आहेत... राजेश काफरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, युवा सेना जिल्हा विस्तारक सुधीर ढाणे, युवा सेना जिल्हाप्रमुख बंटी यांच्या आपल्या पदाचा राजीनामा संपूर्द केला आहे...

प्रतिक्रिया :-

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्व बाजूनी टिकणारे व कायमचे मराठा आरक्षण द्यावे तसेच मराठा समाजाप्रति असणाऱ्या माझ्या व माझ्या समाजाच्या वतीने कृतज्ञ होण्यासाठी व कर्तव्य म्हणून मी माझ्या युवा सेना रोहा तालुका अधिकारी पदाचा राजीनामा देत आहे..- राजेश काफरे, युवा सेना रोहा तालुकाप्रमुख

Post a Comment

Previous Post Next Post