माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
मुंबई येथील कुणबी समाजोन्नती संघ श्रीवर्धन शाखा (मुंबई) कमिटीच्या वतीने सन्मान देऊन गौरविण्यात आले
कुणबी समाजाचे देवदूत तथा कुणबी हृदयसम्राट कै.ग.स.कातकर यांच्या स्मरणार्थ श्रीवर्धन कुणबी समाज यांच्या वतीने समाजाचे होतकरू तसेच समाजासाठी कार्य करणारे, समाजाची तळमळ व समाजासाठी झटणारे श्रीवर्धन मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा.आमदार तुकाराम सुर्वे व कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष शंकरराव डोंबळे यांना कै.ग.स.कातकर सन्मान दिनांक २९/१०/२०२३ रोजी सी.पी.टॅंक, मुंबई येथील कुणबी समाजोन्नती संघ श्रीवर्धन शाखा (मुंबई) कमिटीच्या वतीने सन्मान देऊन गौरविण्यात आले...
त्याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विभागातील संघटक महेश सुर्वे,अमर खेरटकर,संजय कोबनाक तसेच सामाजिक कार्यकर्ते रोहिदास डोंबळे,सतीश शिर्के,दशरथ गजमल, महादेव भुवड व कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...