महाराष्ट्र वेदभुमी

सत्तेकरिता भाजपा नीच गलिच्छ राजकारण करीत आहे - माजी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते



बुधवार दिनांक ११/१०/२०२३

 पेण (प्रतिनिधी) : 

केवळ सत्ता मिळवण्याकरिता भारतीय जनता पार्टी नीच व गलिच्छ राजकारण करीत आहे... आपले राजकीय विरोधक पक्ष संपवण्याकरिता व कायम सत्तेत राहण्याकरिता भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी फोडुन सुसंस्कृत महाराष्ट्राला गलिच्छ राजकारणाचा कालीमा फासला आहे...भाजपने सुरु केलेल्या फोड़ाफोडीचे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रातील जनतेला मुळीच मान्य नाही... आगामी निवडणूकांमध्ये सुज्ञ मतदार भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, तसेच गद्दारांची परवा आपल्याला करायची गरज नाही कारण त्यांना जनता गाढल्याशिवाय राहणार नाही...असे प्रतिपादन माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी पेण येथे आयोजित शिवसेना मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात केले...यावेळी मिंदे गटाचे युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील, अमित टवरी, (टिपू)सुलतान साटी, अमित पाटील, किशोर मोहिते, सागर पाटील, प्रसाद पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर मध्ये प्रवेश केला...

राज्यावर सरकार नाही तर प्रशासक राज्य करीत आहे 

या प्रसंगी पुढे बोलताना अनंत गीते म्हणाले की मिंदे सरकार निवडणुकीला घाबरत आहे. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायत आदींची मुदत संपून जवळजवळ दोन वर्ष झाली असताना देखील ते निवडणूका घेत नाहीत कारण मतदारांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकड़े असणारा कौल आहे. यामुळे मिंधे आणि भाजप यांना धड़की भरली आहे...३ अनेक ठिकाणी प्रशासक राज्य करत आहेत... त्यामुळे राज्यात भाजप शिंदे सरकार नसून प्रशासकांचे राज्य आहे... 

पेण विधानसभा व पेण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार

शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर यांच्या मागणीनुसार पेण विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल तसेच विधानसभेसह पेण नगर परिषदेवरही शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला...


मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान,तेलंगणा आणि मिझोरम या पैकी एकही राज्यात भाजप सत्तेवर येणार नाही. 

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये  होणार आहेत...यापैकी एकही राज्यात भाजप सत्तेवर येणार नाही... भाजपची जी अवस्था कर्नाटकात झाली तीच अवस्था या पाच राज्यांमध्ये होणार आहे...आणि महाराष्ट्रात भाजपचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत अशी खात्री त्यांनी यावेळी दिली...येत्या १७ मे ला लोकसभेची मुदतही संपत आहे त्यामुळे १७ मे २०२४ ला नवीन लोकसभा गठित होणे आवश्यक आहे... आपल्या देशाच्या घटनेत किंवा कुठेही लोकसभा पुढे ढकलण्याची तरतूद नाही. कोणी कितीही मनात आणलं तरी बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे हुकूमशाही या देशावर राज्य करू शकत नाही... लोकसभा १७ मे पूर्वी गठीत व्हायची आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत...आगामी सर्व निवडणुका शिवसेना इंडियाच्या माध्यमातून एकत्रितपणे लढणार असून या निवडणुकीमध्ये इंडियाचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली...


शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

पेण येथील महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित शिवसेना मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, सुवर्णा वाळुंज, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, संजय कदम, विलास आंग्रे, चंद्रकांत गायकवाड, युवा सेनेचे सुधीर ढाणे, रशाद मुजावर, वाहतूक सेनेचे श्रीतेज कदम, शिशिर धारकर, मिहीर धारकर, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील संतोष पाटील, दिलीप पाटील, प्रदीप वर्तक, चेतन मोकल, राजाराम पाटील, शहर प्रमुख मयुरेश चाचड,समीर म्हात्रे, राकेश मोकल, विनोद म्हात्रे, अच्युत पाटील, प्रवीण पाटील, विजय पाटील, तुकाराम म्हात्रे, बाळू पाटील, पंकज शहा, हिना कागदी, छाया काईनकर मेघना चव्हाण राजश्री घरत यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post