माणगाव प्रतिनिधी (सिकंदर आंबोणकर )
दिनांक.०१/१०/२०२३
तळाशेत इंदापूर हद्दीतील एस.टी. बस स्थानक परिसर व रुद्रवली आदिवासी वाडी परिसर स्वच्छ
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत "स्वच्छता एक सेवा" उपक्रमांअतर्गत इंदापूर ( तळाशेत )येथे श्री सदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान...स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत "एक तारीख एक घंटा" या भारत सरकारच्या स्वच्छता अभियानात भारत देशाचे स्वच्छता दूत आदरणीय पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने तळाशेत / इंदापूर ग्रामपंचायत हद्दीत रविवार दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले... या स्वच्छता अभियानामध्ये इंदापूर विभागातील व आजूबाजूच्या गावातील श्रीसदस्यांनी सहभाग घेतला... तळाशेत इंदापूर हद्दीतील एस.टी. बस स्थानक परिसर व रुद्रवली आदिवासी वाडी परिसर स्वच्छ करण्यात आला...सकाळी ठिक १० वाजता डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी स्वच्छतेची साधने घेऊन साफसफाई केली...यामध्ये रत्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा व प्लास्टिक बाटल्या उचलून शहराच्या स्वच्छतेचे काम स्वयंस्फूर्तिने व शिस्तबद्ध केले... डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या सौजन्याने संपूर्ण देशात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात... त्यामध्ये आरोग्यशिबीर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप, नैसर्गिक आपत्तीकालीन मदत, रक्तदान, धरणांतील गाळ काढणे, जलपुनर्भरण इत्यादी उपक्रम सामाजिक बांधिलकी या नात्याने राबविले जातात... याच कार्याचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या उपक्रमात सहभाग घेवून स्वच्छता अभियान राबविण्यात आले...
तळाशेत इंदापूर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्वाती नवगणेसह कार्यकर्त्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग
तळाशेत इंदापूर येथे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्वाती नवगणे ,उपसरपंच ग्रामपंचायत तळाशेत समीर मेहता , माजी उपसरपंच तळाशेत उदय अधिकारी,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर विभाग काका नवगणे,अध्यक्ष नवजीवन विद्यामंदिर तळा शेखर शेट देशमुख, माणगाव पंचायत समिती माजी उपसभापती अविनाश मांडवकर, भाजपनेते संजयआप्पा ढवळे , वाहतूक निरीक्षक बस स्थानक इंदापूर श्री. शेलार,यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला..व हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला...
