उरण दि २८ प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे)
शेतकरी कामगार पक्षाची पडझड झाली असली तरीही दिघोडे गावात शेतकरी कामगार पक्ष राहिला आघाडीवरच
शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका अध्यक्ष विकास चंद्रकांत नाईक यांनी हितेश गुणवंत ठाकूर यांना शेतकरी कामगार पक्ष दिगोडे गाव अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही दिल्या... या वेळेस नरेश शेठ घरत, रमाकांत म्हात्रे ,प्रफुल पाटील् अनंत कोळी जयेश कोळी रमेश कोळी, विकास माळी, प्रफुल्ल मात्रे ,शशिकांत ठाकूर ,शक्ती कोळी, पंकज कोळी, नरहरी कोळी, अभिषेक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.दिघोडे गावांमध्ये पूर्वीपासून स्वर्गीय आत्माराम शेठ नाखवा आणि स्वर्गीय दामूशेठ ठाकूर अशी दोनच घरे शेतकरी कामगार पक्षाची होती हळू हळू पक्ष वाढत जाऊन एक छोट्या रोपट्याचं वटवृक्ष झालं. कालांतराने जरी शेतकरी कामगार पक्षाची पडझड झाली असली तरी पण दिघोडे गावात शेतकरी कामगार पक्ष आघाडीवरच राहिला...
व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा
एक काळ होता की शेतकरी कामगार पक्षाची एकही सीट ग्रामपंचायतमध्ये लागणं कठीण होत परंतु आजच्या घडीला तीन शीट लागल्या गेल्या... इलेक्शनच्या वेळेस विजयी करून शेतकरी कामगार पक्षाने आपली ताकद दाखवलेली आहे... आणी तीच ताकद घेऊन शेतकरी कामगार पक्ष २०२४ च्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला तरुण पिढीच्या हातात सूत्रे देऊन इलेक्शनला सज्ज झालेला आहे.मागच्या वेळेस तीन शीट निवडून आल्यानंतर ह्यावेळेस जास्तीत जास्त शीट कशा येतील ह्याकडेे प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाने आपले लक्ष केंद्रित केले आहे...शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष पद भेटल्यानंतर स्वर्गीय दामूशेठ ठाकूर यांचे नातू व शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ते हितेश ठाकूर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की 'मी शेतकरी कामगार पक्ष वाढीस नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन आणि माझ्या अध्यक्षतेखाली गावातील जेवढी रखडलेली कामे आहेत ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीन...'हितेश गुणवंत ठाकूर यांना दिघोडे गाव अध्यक्ष पद मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी त्यांना व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत...