कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे )
अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन खा. सुनिल तटकरे
४० ते ४५ वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना सत्तेच्या माध्यमातून आपल्याला लोकसेवा करण्याची संधी मिळाली... रोहे अष्टमीकर जनतेने माझ्या कार्य पद्धतीवर विश्वास दाखवून सलग २५ वर्षे रोहे अष्टमी नगर पालिकेची सत्ता स्पुर्द केली...राजकारण आणि समाजकारण करताना शहराचा सर्वांगीण विकास हाच मुद्दा केंद्रबिंदू ठेवत लोक हिताची कामे मार्गी लावली...असे सांगत अंजुमन हायस्कुल आणि रेवा या दोन्ही शिक्षण संस्थांना भरघोस निधी देण्याचे भाग्य मला लाभले आहे...उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठबल पाठीशी असल्यामुळे आपण अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले... रोहा एज्यु. अँड वेल्फ. असो. ज्युनियर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते... यावेळी व्यासपीठावर रेवा अध्यक्ष रियाज शेटे, रोहा - अष्टमी अल खैरिया कमिटी अध्यक्ष शफी पानसरे, माजी अध्यक्ष जाफर येरुणकर, समाज सेवक अब्बास अनवारे, समाज अध्यक्ष एजाज किरकिरे, अहमद दर्जी, मयूर दिवेकर, महेश कोलटकर, महेंद्र गुजर, राजू जैन, चेअरमन तौसिफ़ येरुणकर, अ. कादिर रोगे, डॉ. फरिद चिमावकर,डॉ. अजीम दर्जी, मौलाना मसरूर आलम, लियाकत सवाल, मुबीन कर्जिकर, समीर दर्जी, मजीद पठाण, अकील लांबते, सुप्रिया जेटा आदी मान्यवर व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते...
ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी १० लाख रु. खर्च करून बांधण्यात येणाऱ्या शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन
खा. सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने ओ.एन.जी.सी. कंपनीच्या सी. एस. आर. फ़ंडातून व सुरभी स्वंसेवी संस्थेच्या सहकार्याने ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे १० लाख रु. खर्च करून बांधण्यात येणाऱ्या शौचालयाच्या कामाचे.भूमिपूजन खा. तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले... ओ.एन.जी.सी. कंपनीच्या माध्यमातून आपण ५ तालुक्यात १ कोठीहुन अधिक सीएसआर फ़ंडातून निधी वापरून सुसज्ज शौचालय बांधण्यात आले आहेत... असे सांगत या शालेय संकूलातील नवीन इमारत, लॅब, कम्पुटर लॅब, सीएसआर फ़ंडातून अनेक कामे मार्गी लावून अल्पसंख्यांक समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आपल्याला या गोष्टीचा रास्त अभिमान वाटतं असल्याचे खा. तटकरे म्हणाले...
२० मिनिटापैकी १५ मिनिटं त्यांनी हिंदी भाषेत भाषण देत उपस्थित शिक्षक व मुस्लिम समाज बांधवांची जिंकली मने
नेहमी मराठीत भाषण करणाऱ्या खा. सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणाची सलाम करून केली. त्यानंतर २० मिनटा पैकी १५ मिनट त्यांनी हिंदी भाषेत भाषण देत उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व मुस्लिम समाज बांधवांनी मने जिंकली. दिल्लीत लोकप्रतिनिधीत्व करणारा आपल्या लोकप्रतिनिधीची हिंदी भाषेवर जबरदस्त पकड असल्याचे बघून उपस्थित समाज बांधव आश्चर्यचकित झाले...
फोटो केप्शन : रेवा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या सुसज्ज शौचालय बांधकामचे भूमिपूजन करताना खा. सुनिल तटकरे सोबत अन्य मान्यवर
