कोलाड प्रतिनिधी: (श्याम लोखंडे)
जालना अमानुष लाठीचार्ज निंदनीय प्रकार गृहमंत्र्यांनी खुलासा द्यावा उपस्थित मराठा समाज बांधवांची मागणी
जालना येथे उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवांनावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी रविवारी मराठा समाजाच्यावतीने रोहा बाजारपेठ बंदची हक दिली होती. व्यापारी बांधवांनी दोन तास आपली दुकानें बंद करून मराठा समाजाच्या बंदला जाहीर पाठींबा दर्शविला. कुणाच्या आदेशाने अमानुष लाठीचार्जचा निंदनीय प्रकार घडला याचा गृहमंत्र्यांनी खुलासा द्यावा अशी मागणी उपस्थित मराठा समाज बांधवांनी केली...
व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद...दुपारी १२ नंतर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय नाही...
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला...शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून रक्तबंबाळ केले...हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल असे आवाहन रोह्यात सकल मराठा समाज बांधवांनी केले. रविवारी सकाळी १० ते १२ वा.पर्यंत दोन तास बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केले होते..या आवाहानाला व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला... दुपारी १२ वा. नंतर व्यपारी बांधवांनी आपापली दुकानें सुरु केल्याने बाजारात खरेदीसाठी ग्रामीण भागातुन आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली नाही...
सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख यांसह.रोह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख उपाध्यक्ष नितीन परब, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, महेश सरदार, अमित उकडे, शशिकांत मोरे, संदीप सरफळे, राजेश काफरे, निलेश शिर्के, प्रकाश देशमुख, सुभाष देशमुख, बबन देशमुख, अनंत देशमुख, प्रशांत देशमुख, अमोल देशमुख, परशुराम चव्हाण, लीलाधर देशमुख, मधुकर पार्टे, मयूर पायगुडे, अजित मोरे, सूर्यकांत मोरे, चंद्रकांत पार्टे, अक्षय देशमुख, महिला आघाडीच्या प्राजक्ता चव्हाण ,स्वरांजली शिर्के यांच्यासह रोह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...
