विशेष प्रतिनिधी पेण
जनतेचे रखडले प्रश्न सोडविण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात
पुढील येणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रत्येक पक्षाने आपापला मोर्चा हा पक्ष बांधणीसाठी वळवताना दिसत आहेत...आजपर्यंत वेळोवेळी प्रत्येक पक्षाचे खासदार या रायगड लोकसभेमध्ये होऊन गेले पण रायगडची दुर्दशा आजतगायत जैसे थे अशीच आहे... खड्डेमय रस्ते, गांवोगावी पाणी टंचाई, लाईटचा प्रश्न, असे कितीतरी सुविधा काही ठिकाणी उपलब्ध झालेल्याच नाही.. जनतेचे हेच रखडले प्रश्न सोडविण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरताना आपल्याला दिसत आहे...
मनसे पक्षाचा एकच नारा प्रश्न जिथे जनतेचा पक्ष तिथे मनसेचा
पेण येथे मंगळवार दिनांक १२/९/२०२३ रोजी झालेल्या मोर्चा बांधणी बैठकीत मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे तसेच महाराष्ट्र सरचिटणीस वैभव जी खेडेकर महिला महाराष्ट्र सरचिटणीस स्नेहल ताई जाधव तसेच रायगड जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष तसेच बाकीचे मनसे पधादिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...आता मनसे पक्षाचा एकच नारा प्रश्न जिथे जनतेचा पक्ष तिथे मनसेचा.
