माणगाव प्रतिनिधी:-
रेशन दुकानदारांकडून वाटप करण्यात आलेल्या धान्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचे आढळले तांदूळ
दिनांक २९ ऑगस्ट :माणगाव तालुक्यामध्ये रेशन दुकान कार्डधारकांना तथा माणगाव तालुक्यातील येरद आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना रेशन दुकानदारांकडून वाटप करण्यात आलेल्या धान्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचे तांदूळ आढळले आहेत...जेवण बनवताना जेव्हा हे तांदूळ धुतले गेले तेव्हा हे तांदूळ पाण्यावर वर तरंगताना आदिवासी बांधवांना दिसले...याबाबत आदिवासी बांधवांनी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना व माणगाव तालुका आदिवासी कातकरी समाज संघटना यांच्याकडे धाव घेतली... तांदूळ पाहिल्यानंतर आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती...हे तांदूळ प्लास्टिकचे असून ते आम्हाला मारण्यासाठीच दिले आहेत अशी भावना आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झाली होती...मात्र याबाबत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष भिवा पवार जिल्हा सचिव राम कोळी व माणगाव तालुका आदिवासी कातकरी समाज संघटना अध्यक्ष मारुती पवार व वनमित्र ग्रुपचे कार्यकर्ते राम वालेकर ,चंदर वालेकर या आदिवासी कार्यकर्त्यांनी त्वरित माणगावचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विकास गारुडकर यांची भेट घेतली...व सदरील तांदूळ दाखवले असता सदरील तांदूळ हे प्लास्टिकचे नसून ते आरोग्यवर्धक असून पोषण तत्व गुण संवर्धन संवर्धित हे तांदूळ आहेत.. आदिवासी बांधवांनी घाबरून न जाता सदरील या तांदळाचे सेवन करावे... यांनी आरोग्याला फायदाच होणार असल्याचे मत माणगावचे कार्यतत्व कर्तव्यदक्ष तहसीलदार विकास गारुडकर यांनी आदिवासी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले...
सदरील तांदळाचे सेवन करावे...तांदूळ आरोग्यवर्धक असून पोषण तत्व गुण संवर्धन संवर्धित..तहसीलदार गारुडकर
या कच्च्या तांदळामध्ये सी एम आर मिश्रित करून ज्यामध्ये आर्यन फॉलिक ऍसिड व जीवनसत्व बी-१२या या तीन सूक्ष्म पोषण तत्वांद्वारे तांदूळ गुणसंवर्धित केला आहे. आदिवासी बांधवांनी घाबरून जाता सदरील तांदळाचे सेवन करावे यांनी आरोग्याला फायदाच होणार असल्याचे मत तहसीलदार गारुडकर यांनी व्यक्त केले...रायगड जिल्हा एकलव्य संघटनेचे भिवा पवार, जिल्हा सचिव राम कोळी, माणगाव तालुका आदिवासी कातकरी समाज संस्थेचे अध्यक्ष मारुती पवार, मित्र ग्रुपचे कार्यकर्ते राम वालेकर,चंदर वालेकर व आदिवासी बांधव उपस्थित होते...