रोहा धाटाव प्रतीनिधी महेश वाडकर
रस्त्यावरचे खड्डे म्हणजेच भ्रष्टाचारांचे अड्डे
दिनांक २५ ऑगस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७ ऑगस्ट रोजी कोकण जागर यात्रा पळस्पे ते लांजा या ठिकाणासह काढण्यात येणार आहे...त्यासाठी कोकणातील सर्व नागरिकांनी एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे...
रस्ता आहे जनतेचा...नाही कोणाच्या बापाचा
सतरा वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्यापही दुरावस्थेत आहे... मुंबई गोवा महामार्गाकडे राजकर्त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही...कोकणचा कॅलिफोर्निया करायला निघालेले राज्यकर्ते...इथे मात्र कोकणातील महामार्गावर जनतेला धड चाळण्यासाठी रस्ता नाही...तर वाहन चालकाने वाहन चालवावी कशी?प्रवाशांनी प्रवास करायचा तरी कसा? मुंबई गोवा महामार्गाचा समृद्ध कोकण मार्ग होईपर्यंत आता गप्प बसून चालणार नाही...त्यासाठी कोकणातील जनतेने आता याकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे...आणि यामध्ये बदल करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम कोकणवासीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनंती करण्यात येते की दिनांक २७ ऑगस्टला कोकण जागर यात्रांमध्ये सर्वांनी सामील होऊन सत्ताधारी पक्षाला दाखवून द्यायचे की आता कोकणातील जनता गप्प बसणार नाही...रस्ता आहे जनतेचा... नाही कोणाच्या बापाचा...
हळकुंडच्या पदरात शेळकुंड
कोकणात १९ आमदार.... सत्तेत१५ तर खासदार ४ सत्तेत ३ तरी कोकण मात्र खड्ड्यातच...मुंबई गोवा महामार्ग अजूनही दुरावस्थेत ताटकळत पडलेला आहे....आता बदल घडवण्याची वेळ आहे....आता तरी इथली माणसं बदला विचार बदला आणि आपला कोकण बदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इशारा...
