कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे
कुणबी समजोन्नोती समाज बांधवांना एकत्र करून कमीटीचे पुनर्बाधणी करण्यात यावी...अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी केले आवाहन
मुबंई ,ग्रामीण शाखा -रोहा माध्यमातून तालुका स्तरावर चणेरा विभाग ,धाटाव विभाग,कोलाड विभाग,ऐनघर विभाग, नागोठणे विभाग,सोनगाव विभाग कुणबी समाज ग्रुप जसे कार्यान्वीत झाले आहे ...त्याचा आदर्श इतर विभागीय कुणबी समाज ग्रुपने घेतला पाहिजे... याकरिता पुन्हा प्रत्येक ग्रुपने आपल्या समाज बांधवांना एकत्र करून कमीटीचे पुनर्बांधणी करण्यात यावी...असे आवाहन अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी केले...कुणबी समाजाचे मुंबई संघांवर आपल्या रोहा तालुक्यातील समाज नेते शंकरराव म्हसकर, मा.पं.स.उपसभापती रोहा रामभाऊ सकपाळ , समाज नेते रायगड जिल्हा ओ.बी.सी.अध्यक्ष सुरेश मगर ,शकर भगत, यांची निवड करण्यात आली...
जय भवानी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेवर कुणबी समाजचे संचालक बिनविरोध निवडून आल्याबद्दल सत्कार
यावेळी उपस्थित समाज नेते रामचंद्र सकपाळ यांनी ज्याप्रमाणे चणेरा ग्रुपने ज्या सामाजिक नियमावली तयार केली आहे.. तीच सर्व तालुक्यातील समाज बांधवांनी आचरण करावे...तसेच सुरेश मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व ग्रुप मधील गावपातळीवर कुणबी समाज जनगणना करण्यात यावी...रोहा तालुका कुणबी समाज उपाध्यक्ष मारुती खांडेकर, रोहा तालुका कुणबी समाज उपाध्यक्ष गोपीनाथ गंभे, रोहा तालुका कुणबी समाज सेक्रेटरी दत्ताराम झोलगे,रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे,सुहास खरीवले, सतिश भगत चणेरा ग्रुप अध्यक्ष नरेद्र सकपाळ, धाटाव ग्रुप अध्यक्ष दिनेश रटाटे,सोनगांव ग्रुप अध्यक्ष खेळु ढमाल,ऐणघर ग्रुप अध्यक्ष यशवंत हळदे, धाटाव ग्रुप शशिकांत कडू, शंकर कदम महेश तुपकर , विनोद बाईत, नामदेव म्हसकर, किशोर रटाटे,सह तालुक्यातील जेष्ठ श्रेष्ठ कुणबी समाज बांधव व आदी कार्यकरणी सभासद उपस्थित होते...यावेळी धाटाव ग्रुपमधील कमेटी व चणेरा ग्रुप कमेटीचे सत्कार करण्यात आला...तसेच जय भवानी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेवर कुणबी समाजचे संचालक बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्याचा सुध्दा सत्कार करण्यात आला...
रायगड जिल्हा कुणबी समाज उपाध्यक्ष शंकरराव भगत, अनंत थिटे,शशिकांत कडू यांनी समाजाविषयी व्यक्त केले मनोगत
ओबिसी रायगड जिल्हा अध्मक्ष कुणबी समाज नेते सुरेश मगर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आपण आपल्या प्रत्येक गाव वाडीमध्ये कुणबी समाजाची किती घर आहेत...त्याची लोकसंख्यासह जनगणना केली पाहिजे... असे आवाहन समाज बांधवांना यावेळी केले...जेष्ठ समाज नेते शिवराम महाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मुंबई संघावर जास्तीतजास्त आजीव सभासदांची नोंदणी करा...कुणबी समाजातील आजच्या सामाजिक परिस्थितीवर जेष्ठ नेते रायगड जिल्हा कुणबी समाज उपाध्यक्ष शंकरराव भगत, अनंत थिटे, शशिकांत कडू यांनी देखील समाजाविषयी आपले मनोगत व्यक्त केले...
