महाराष्ट्र वेदभुमी

७७ वा स्वातंत्र्य दिन प्रभाकर न पाटील माध्यमिक शाळा तळाघर येथे संपन्न

धाटाव रोहा प्रतिनिधी:महेश वाडकर

मुख्यध्यापक श्री सागर शिंदे सर यांनी केली कार्यक्रमाची सुरुवात

प्रभाकर न पाटील माध्यमिक शाळा तळाघर येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला... कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्यध्यापक श्री सागर शिंदे सर यांनी केली...ध्वजारोहन शाळेचे चेअरमेन श्री विठ्ठल मोरे यांच्या शुभहस्ते झाले...कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली... विद्यार्थी वर्गाचे आपल्या देशावर्ती असलेले प्रेम त्यांच्या भाषनातून तसेच घोषणातून एकवयास मिळाले...

विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन आले गौरविण्यात..

समस्त मान्यवरांच्या हस्ते प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले...तसेंच कार्यक्रमामध्ये उपस्थित धाटाव विभाग मनसे अध्यक्ष महेश वाडकर, पत्रकार राजेंद्र जाधव, शाळेय कमिटीचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, माजी सैनिक तुकाराम कदम, बळीराम भगत, सखाराम बर्जे तसेच शाळेय शिक्षक उपस्थित होते...तसेच  विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले...तद्नंतर कार्यक्रमाची सांगता शाळेचे उपमुख्यध्यापक यांनी केली..

Post a Comment

Previous Post Next Post