महाराष्ट्र वेदभुमी

रोहा : बळीराजा फाऊंडेशनच्या माध्यमातून विभागातील शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक उंचावेल, उत्तम कार्य घडो, बारदेशकर यांचे मार्मिक प्रतिपादन

 


कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे) 

बळीराजा फाउंडेशनच्या मध्यवर्ती कार्यालयाचे शानदार उद्दघाटन 

दिनांक १५ ऑगस्ट: आपल्या कालव्याच्या लढयाला अपेक्षित यश येत आहे, प्रचंड संघर्ष केलात, त्याला तोड नाही...कालव्याला पाणी येणार असल्याने संपूर्ण विभाग पुन्हा हिरवेगार होईल... आता बळीराजा फाउंडेशनच्या माध्यमातून  विभागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल...शासकीय योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे... त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक उंचावेल, बळीराजा फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तम कार्य घडो, शेतकऱ्यांना जे जे सहकार्य लागेल, ते सर्व सहकार्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.तरुणांनी नोकरी, धंदा सांभाळून शेतीकडे आधुनिकतेने वळावे...यश आणि समाधान निश्चित आहे...अभ्यास दौरा करा, नवनवीन गोष्टी तुमच्या विभागात राबवता येतील असे प्रयत्न करा...आम्ही सोबत आहोत असे मार्मिक प्रतिपादन रोहा इंडस्ट्रियल असो.चे अध्यक्ष उद्योजक पी पी बारदेशकर यांनी केले. तळाघर येथील बळीराजा फाउंडेशनच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.तळाघर येथील बळीराजा फाउंडेशनच्या कार्यालयाचे स्वातंत्र्यदिनी शानदार उद्घाटन झाले... 

विभागातील शेतकऱ्यांच्या सर्वांग हितासाठी बळीराजा फाउंडेशनची झाली स्थापना 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी महादेव करे, व्हिआरटी सेंटरचे व्यवस्थापक सुशील रेळेकर, प्रगत शेतकरी हेमंत ठाकूर, रंगीत फुलांचा शहर कळसगिरी प्रकल्पाचे प्रमुख सुरेंद्र निंबाळकर, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, कृषी अधिकारी राक्षिकर, पत्रकार जितेंद्र जाधव, विनायक पाटील, संस्थापक राजेंद्र जाधव व मान्यवर उपस्थित होते...विभागातील शेतकऱ्यांच्या सर्वांग हितासाठी बळीराजा फाउंडेशनची स्थापना झाली आहे... संघटनेची खरच गरज होती... व्हिआरटी सेंटरच्या माध्यमातून भागासाठी जे जे करणे शक्य आहे, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू, समाजातील चांगले लोक एकत्र येऊन संघटना उभी केल्याने खूप आनंद झाला आहे... आता पूर्ण विभाग सुजलाम,सुफलाम करण्यासाठी संघपणे झटू या, अशी भावना सुशील रेळेकर यांनी व्यक्त केली...कृषी अधिकारी महादेव करे यांनी उपस्थित शेतकरी, तरुणांना भावनिक साद घातली... तुम्ही हाक मारत जा, आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत... 

तळाघर येथील ओमकार मोरे याची पोलीस भरतीत निवड झाल्याबद्दल अभिनंदन

या भागासाठी आपल्याला अनेक कृषी योजना राबवायच्या आहेत...सबंध तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजना मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहोत... तुम्ही मागणी करा, खरंच जास्त देऊ, असे सांगत झेंडा कोणाचाच घेऊ नका... पण सगळ्यांच्या झेंड्याची सावली घ्या, हे वास्तव करे यांनी अत्यंत खुबीने सांगत भरकटलेल्या तरुणांना एकतेसाठी साद घातली... भागासाठी बिजामृत शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करू, सेंद्रिय शेती काळाची गरज आहे... त्यादृष्टीने आपण मार्गदर्शन उपक्रमातून काम करू या असे सहकार्याचे मनोदय महादेव करे यांनी व्यक्त केला... संस्थापक राजेंद्र जाधव यांनी शेतकऱ्यांप्रती तळमळ व्यक्त केली... कालव्याच्या पाण्याचा लढा आम्ही जिंकला... आता भागातील शेतकऱ्यांना एकत्र करून आधुनिक शेती, त्यातून तरुण शेतकऱ्यांना शेतीतूनच रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत... सर्वच शेतकऱ्यांच्या हितासाठी बळीराजा फाउंडेशन काम करणार आहे...असे जाधव प्रास्ताविकात सांगितले. हेमंत ठाकूर यांनी आपण शेतीत आतापर्यंत अनेक प्रयोग केले... शेतीत नक्कीच यश आहे... पण जिद्द हवी, अभ्यास हवा, यापुढे आपणही बळीराजा फाउंडेशनला सहकार्य करू...असे अभिवचन ठाकूर यांनी दिले... यावेळी तळाघर येथील ओमकार मोरे याची पोलीस भरतीत निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले... नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या   उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला... यावेळी बळीराजा फाउंडेशनचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करण्यात आला... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड. दीपक भगत यांनी तर आभार प्रदर्शन महेश कांबळे यांनी केले...कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष तुकाराम भगत, सागर भगत, सचिव एड. दीपक भगत, खजिनदार रुपेश साळवी, महेश कांबळे, संदेश मोरे, राकेश बामुगडे, तुकाराम मोरे, कृष्णा बामणे, हेमंत माने, नंदकुमार बामुगडे, राम महाडीक,  नितेश बामुगडे, योगेश राऊत, ज्ञानेश्वर बामुगडे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post