महाराष्ट्र वेदभुमी

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ



रायगड (जिमाका), दि.२९ऑगस्ट: 

दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी डिसेंबरपर्यन्त सर्वसमावेशक धोरण...मुख्य मार्गदर्शक आ. बच्चू कडू

दिनांक २९ ऑगस्ट दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने ८२ शासन निर्णय निर्गमित केले आहे...या दिव्यांग बांधवांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी डिसेंबरपर्यन्त सर्वसमावेशक धोरण आणले जाईल...अशी ग्वाही देत दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा...असे आवाहन 'दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आ.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले...

विरुपाक्ष मंगल कार्यालयात 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' अभियानाअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मेळावा

पनवेल येथील विरुपाक्ष मंगल कार्यालयात 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या अभियानाअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते... यावेळी व्यासपीठावर रायगड अलिबाग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त गिरीश भालेराव,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी श्याम कदम देशमुख आदी उपस्थित होते...

दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळण्यासाठी प्रयत्न 

मुख्य मार्गदर्शक श्री.कडू म्हणाले, दिव्यांगांचे सर्वेक्षण चांगल्याप्रकारे होईल याची सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी. या माहितीच्या प्रक्रीयेत सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअरही चांगल्या दर्जाचे उपयोगात आणण्यावर भर द्यावा. सर्व दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिकांनी बहुविकलांग व्यक्तींसाठीचे धोरण लागू करावे आणि देशाला मार्गदर्शक काम करावे...  शासनाने दिव्यांगांसाठी मंत्रालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय महत्वाचा आहे... दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे....दिव्यांगांच्या  तक्रारी दूर होणे हे प्रशासनाचे यश आहे...

पनवेल येथे दिव्यांगांसाठी माॅल उभारण्याबाबत नियोजन  

दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असूनही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो...त्यांना साथ आणि संधी दिल्यास ते  भव्यदिव्य यश संपादन करू शकतात असेही श्री कडू यांनी यावेळी सांगितले..शासनस्तरावर दिव्यांग कल्याण यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.  दिव्यांगांसाठी ५ टक्के खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे... दिव्यांगांना देण्यात येणारे अर्थसहाय्य दरमहा वेळेत मिळेल यासाठी  व्यवस्था निर्माण करण्याचेही विचाराधीन असल्याचेही श्री.कडू म्हणाले... यावेळी पनवेल येथे दिव्यांगांसाठी माॅल उभारण्याबाबत नियोजन करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली..प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बास्टेवाड म्हणाले,दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत..यासाठी करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत असताना या प्रक्रियेला गती देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...वैयक्तिक  आणि सामूहिक लाभाच्या योजनाचा लाभ देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे...इलेट्रिक स्कुटर देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजन केले आहे...ग्रामीण भागातील सर्व दिव्यांगांना योजनांचा लाभ देता यावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले...यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांचे भाषण झाले...महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमा़ंबाबत माहिती दिली...

निवेदने देण्यासाठी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 

आ. श्री.कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला...  कार्यक्रमापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी शिबिरातील विविध कक्षांना भेट देऊन माहिती घेतली... कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...याप्रसंगी निवेदने देण्यासाठी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ,त्यांची जागेवर जावून भेट घेत निवेदने स्विकारली....


Post a Comment

Previous Post Next Post