महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती रायगड जिल्हा कार्यकारणी सभा संपन्न.


कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे 

"त्याग, निष्ठा आणि सेवा" हे ब्रीदवाक्य असणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा रायगड' ची दुसरी "जिल्हा कार्यकारणी सभा"शिक्षक सहकारी पतपेढी रोहा येथे दिनांक  ५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाध्यक्ष अजय कापसे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली..सर्वप्रथम  ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त, थोर कवी ना.धो.महानोर, कलादिग्दर्शक नितीन देसाई,कै वाटवे गुरूजी, कै.चावरेकर गुरुजी, कै.कोळी मॅडम व इतर ज्ञात अज्ञात भारतवासियांना श्रद्धांजली अर्पण केली...नूतन पेण कार्यकारणीची घोषणा करण्यात आली... तालुकाध्यक्ष पांडुरंग म्हात्रे व सरचिटणीस मनोज ठाकूर यांची निवड करण्यात आली..

 रोहा तालुकाध्यक्ष नारायण गायकर यांच्या नेतृत्वाखाली   आणि सर्व संचालक मंडळ यांचा सत्कार 

रोहा तालुकाध्यक्ष  नारायण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त राज्य संघटक शरद पाटील व  नवनियुक्त कोकण विभाग प्रमुख प्रसाद म्हात्रे तसेच जिल्हास्तरावर नूतन जिल्हा सहसचिव भारत वाढवळ व जिल्हा महिला संघटक सौ.अश्विनी पार्टे यांची नेमणूक करण्यात आली..नवनिर्वाचित रोहा पतपेढी चेअरमन संतोष यादव, व्हाईस चेअरमन शशीकांत शेळके व  चिटणीस किशोर जाधव आणि सर्व संचालक मंडळ यांचा देखील सत्कार करण्यात आला.. तदनंतर जिल्हा सचिव सुरेंद्र मनवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून सर्वानुमते मंजूर करण्यात आले...

आदर्श शिक्षक समितीच्या  गुणवंत शिक्षक बंधूभगिनींच्या कार्याची योग्य दखल व गुरूगौरव पुरस्कार घेण्याबाबत सूचना..

जिल्हाध्यक्ष  अजय कापसे सर यांनी संघटन शक्तीचे महत्व व चळवळीचे सामर्थ्य सोदाहरण सर्वांना पटवून दिले.. जिल्ह्यातील शिक्षक  बांधवांचा सहाव्या टप्प्याचा बदली प्रश्न बाबत मंत्रालयात अधिकृत पत्र देणारी एकमेव संघटना म्हणून आदर्श शिक्षक समिती सर्वार्थाने कशी आदर्श काम करते हे देखील सांगितले. बी एल ओ कामाच्या जाचातून  लवकरच तोडगा निघेल असे आश्वासनही त्यांनी दिले...तसेच आदर्श शिक्षक समितीच्या  गुणवंत शिक्षक बंधूभगिनींच्या कार्याची योग्य दखल घेण्याकरीता गुरूगौरव पुरस्कार घेण्याबाबत सूचना केली..

कार्यक्षम शिक्षक बांधव आदर्श शिक्षक समितीला जोडण्यासाठी प्रयत्न शिक्षकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य व सत्यासाठी लढा याबाबतचे दिले अभिवचन 

कार्याध्यक्ष.भालचंद्र पाटील यांनी शाळेच्या वेळेत सातत्याने बदल होत असून ती एकदाच योग्य निश्चित करण्याबाबत प्रयत्न व्हावेत असे सांगितले. तसेच सर्वांगीण समायोजनाच्या बाबतीत देखील व्यवस्थितपणा असावा असे सूचनाही केली...कोकण विभाग प्रमुख  प्रसाद म्हात्रे यांनी आपल्या कामातून संघटनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन  केले..तसेच कार्यक्षम शिक्षक बांधव आदर्श शिक्षक समितीला जोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचवले...शिक्षकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य व सत्यासाठी लढा नेहमीच आदर्श शिक्षक समिती उभारेल याबाबतचे अभिवचन दिले... सर्व्हिस बुक नोंद वेळीच लक्ष देणे, संघटन वाढीसाठी तालुक्यात प्रयत्न करणे, लढा निधी/ आकस्मिक निधी म्हणून रक्कम जमा करणे संघटन वाढीसाठी कसे आवश्यक आहे हे सोदाहरण त्यांनी पटवून दिले...रोहा तालुकाध्यक्ष  नारायण गायकर यांनी ऑनलाईन कामे बंद करण्याबाबत प्रयत्न व्हावे असेे सुचवले. ..विद्यार्थी गणवेश त्रूटी, ऑडिट बाबतचे विविध विषय, रोहा तालुक्यातील रिक्त शिक्षक जागा भरणे, विशेष शिक्षकांचे प्रश्न, केंद्रप्रमुख यादी संभ्रमावस्था व त्याबाबत चौकशी अशा शिक्षकांच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला... वरिष्ठ स्तरावरून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सुचविले..

 SSA ऑडिट विद्यार्थी उपस्थिती भत्ता अशा अनेक शिक्षकांच्या प्रश्नाना फोडली वाचा ...त्याबाबत निर्णय

माणगाव तालुकाध्यक्ष संतोष मालोरे यांनी विद्यार्थी आधार कार्ड त्रुटी, एक ते दोन पटाच्या शाळा समयोजित करून शिक्षक समायोजन, एक शिक्षकी शाळेत शिक्षकांनी बीएलओचे काम कसे करावे?,SSA ऑडिट विद्यार्थी उपस्थिती भत्ता अशा अनेक शिक्षकांच्या प्रश्नाना वाचा फोडली...त्याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली...रोहा नगरपालिका अध्यक्षा सौ. नम्रता पानसरे मॅडम यांनीा नगर पालिका स्तरावर  केंद्रप्रमुख पद असावे  तसेच नगरपालिका शिक्षकांसाठीदेखील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार निर्माण व्हावा अशी मागणी केली. 

जिल्हा समन्वयक संतोष यादव यांनी ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना सहकार्य करण्याचे आवाहन केले

पनवेल तालुकाध्यक्ष आनंदं पाटील यांनी पदोन्नती  मुख्याध्यापक भरणे बाबत प्रयत्न व्हावेत...शाळेची वेळ निश्चित होऊन वर्षातून एकदाच त्यामध्ये बदल व्हावा,...यु डायस संच मान्यता, वर्षभरातील शिक्षकांकडून अपेक्षित असणारी माहितीची एकच लिंक तयार करून एकदाच भरून घ्यावी. जेणेकरून वर्षभर माहिती देणे मध्ये वेळ जाणार नाही...असे  हिताचे उपाय सुचवले...जिल्हा समन्वयक  संतोष यादव यांनी ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

सभेचे सूत्रसंचालन श्री नारायण गायकर व सुरेंद्र मनवे यांनी व आभार संतोष शेवाळे यांनी मानले.

 जिल्हा कार्यकारणी सभेस उपस्थित जिल्हाध्यक्ष अजय कापसे, राज्य संघटक शरद पाटील, कोकण विभाग प्रमुख प्रसाद म्हात्रे, जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र मनवे, जिल्हा समन्वयक संतोष यादव, जिल्हा कार्यालयीन चिटणीस किशोर जाधव, जिल्हा संपर्क तथा प्रसिद्धीप्रमुख प्रसाद साळवी रोहा तालुकाध्यक्ष  नारायण गायकर,पनवेल तालुकाध्यक्ष  आनंदं पाटील, माणगाव तालुकाध्यक्ष  संतोष मालोरे, रोहा नगरपालिका अध्यक्षा सौ. नम्रता पानसरे, रोहा शिक्षक नेते विलास सुटे, शिक्षक नेत्या सौ.अश्विनी पार्टे, रोहा कार्यध्यक्ष शशिकांत शेळके, रोहा कोषाध्यक्ष  प्रशांत चोरगे, शिलेदार  अरुण आगळे, उपाध्यक्ष जयेश महाडिक, कार्या. चिटणीस सचिन मुसळे, विभाग प्रमुख समीर जुवेकर, सौ. तन्वी गुरव, पेणचे शिलेदार-पांडुरंग म्हात्रे श्री मनोज ठाकूर माणगावचे शिलेदार- भारत वाढवळ,पनवेलचे शिलेदार- गजानन मालकर, पद्माकर पाटील,मधुकर तांबोळी व जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष अजय कापसे यांनी तालुकाध्यक्षांनी मांडलेल्या शिक्षकांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्याबाबत योग्य पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन सर्वाना दिले.तसंच नवनियुक्त पदाधिकारी व सर्व संघटनेच्या शिलेदारांना संघटन वाढीसाठी प्रयत्न करण्याकरिता आवाहन केले व शुभेच्छा दिल्या...


Post a Comment

Previous Post Next Post