पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर)
मुंबई-गोवा हायवे रस्ता पूर्ण करण्यासाठी पळस्पे ते इंदापूर दरम्यान कोकण जागर यात्रा काढण्यात आली...तिचा समारोप आंबेवाडी नाका येथे करण्यात आला...यावेळी मनोगत व्यक्त करतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले कि पदयात्रा तसा सभ्य मार्ग असतो...आपल्या पक्षाचा धोरण आहे... पहिल्यांदा हात जोडून जाय, नाही ऐकला तर हात सोडून जाय ज्या कोकणी बांधवानी पदयात्रेत सहभाग घेतला त्यांचे आभार माणण्यासाठी मी येथे आलो आहे... मला या गोष्टीचा आश्चर्य वाटते माझा कोकणी बांधव व भगिनीना गेली अनेक वर्षे हे खड्डे सहन करावे लागते..याचा तुम्हाला राग न येता त्याच त्याच लोकांना निवडून देताय..ते तुमच्या आयुष्याचा खेळ करून ठेवतात या रस्त्यावर किती अपघात झाले किती माणसे गेली असतील... रस्त्याला पडलेले खड्डे भरता येतात परंतु माणसाचा आयुष्य भरता येत नाही... खड्ड्यामुळे अपघातात अनेक माणसे गेली त्यांचे काय? गेली पंधरा ते सतरा वर्षात मुंबई गोवा हायवे वरील २५०० लोके गेली. गाड्यांची किती विल्हेवाट लागली असेल याची माहिती नाही...
मला इकडे येत असतांना जोशी वडेवाले येथे कोणत्या सरकारचा मूर्खपणा आहे...हे मला माहित नाही त्याच्या हायवे वरती फेवर ब्लॉक टाकले... म्हणजे किती पैसे खायचे याची मर्यादा! जगभर सगळे काँक्रीटचे रस्ते दिसतात...केवल फेवर ब्लॉक हे फुटपाथ वर लावायचे असतात...सारखी कॉन्टॅक्ट घ्यायची, सारखी बिल काढायची...त्याची टक्केवारी घ्यायची हे वर्षानुवर्षे चालू आहे...
१९९५ साली माननीय बाळासाहेबांनी सांगितले होते... की मुंबई पुणे रस्ता दोन तासाच्या अंतरावर पार करता येईल असा मला रस्ता बनवायचा आहे... डोंगर घाट पाहता लोकांना वाटायचे असा कसा होईल महाराष्ट्र नेहमी पुढारलेलाच होता... मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रस्ता झाल्यावर कळले कि अशा प्रकारचा रस्ता बांधू शकलो...बाळासाहेबांच्या संकल्पनेतून व नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाला मग देशाला कळले असा रस्ता होऊ शकतो.तेव्हा पासून चांगले रस्ते बनविण्यासाठी सुरुवात झाली ज्या महाराष्ट्राने आदर्श घालुन दिला त्या महाराष्ट्रातला मुंबई गोवा रस्ता असा का? रस्त्यात खड्डे का?१७ वर्षे झाली तरी आम्ही पाहत नाही.हा रस्ता असा ठेवण्यामागे कारण काय तर तुमच्या जमिनी अत्यंत चिरीमिरीने विकत घेऊन त्या रस्ता झाल्यावर १००पटीने विकणार हे प्रमुख कारण आहे...
यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, वसंत मोरे, राजु पाटील, शालिनी ठाकरे,अविनाश जाधव, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, वैभव खेडेकर, देवेंद्र गायकवाड, अमोल पेणकर यांच्यासह मनसेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते...