पेण पोलिस ठाणे येथे निवेदन..!
पत्रकार कैलासराजे घरत : खारपाडा पेण - राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा यांच्या वतीने पेण पोलीस ठाणे येथे पत्रकारांना धमकी देणाऱ्या वक्तव्याचा निषेध करत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे... राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलासराजे घरत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्ध झालेले वृत्तानुसार खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना आक्षेपार्ह भाषा वापरून धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे... पत्रकारांनी जनतेच्या माहितीसाठी प्रश्न विचारणे हे त्यांचे घटनात्मक व व्यावसायिक कर्तव्य आहे... अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे किंवा दडपशाही करण्याच्या प्रकाराने करुन हे लोकशाही मूल्यांचा बाधा पोहोचविते आहे... अशा प्रकारची भाषा लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करणारी आहे... या घटनेमुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे... त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी...
आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
1. पत्रकारांना दिलेल्या कथित धमक्यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी...
2. चौकशीत तथ्य आढळल्यास खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी...
3. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात...
4. पत्रकारांवर दबाव टाकण्याच्या व धमक्या देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी...
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत असून पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, ही विनंती...
यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचालित अन्य अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर मॅडम सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वर्तक सर उपस्थित होते...
