आलिबाग वार्ताहार (मयुरेश जाधव) : दि :- २८/६/२०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पीटलचा स्लॅब कोसळयाची धक्कादायक घटनेची माहिती मिळाली... सुदैवाने त्यावेळी त्याठिकाणी कोणताही रूग्ण किंवा कर्मचारी नसल्यामुळें मोठी जीवितहानी टळली... पण जर त्या वेळी तिथे लोक असते तर मोठा अनर्थ घडला असता, या निष्काळजीपणाची किंमत मोजणार कोण ?
सार्वजनिक रूग्णालयांची अशी दयनीय अवस्था? देखभाल, दुरूस्ती आणि सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?संबंधित अधिकार्यानी या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रुग्णालयाची सुरक्षितता त्वरित सुनिश्चित करावी...हीच जनतेची मागणी आहे..
सर्वसामान्याच्या जीवांशी खेळणाऱ्या भ्रष्ट नेत्याना अधिकार दिला,या निष्काळजीपणाला माफी नाही तर शासनाने ही गंभीर बाब लवकरात लवकर ध्यानात घेऊन आमंलबजावणीं करावी...
